मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी. गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी.गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला जाईल, असं एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराला चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, असं देखील ते म्हणाले.
एनसीबीचे पाच सदस्यांच्या पथकासमोर वानखेडे यांनी आज बुधवारी आपली बाजू मांडली. या पथकाकडून प्रभाकरसह या प्रकरणातील सर्व साक्षीदारांचेही जबाब घेतले जाणार आहेत.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी केली. या चौकशीसाठी एनसीबीचे 5 सदस्यांचे पथक दिल्लीहून आज मुंबईत दाखल झाले आहे. या पथकात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांच्यासह 5 अधिकारी आहेत. या पथकाने आज वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चौकशी पथकासमोर हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा पुनर्रचार वानखेडे यांनी केला. एनसीबीकडून साईल यांच्यासह सर्वच साक्षीदारांचे जबाब घेतले जाणार आहेत.
समीर वानखेडे यांची आज चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून क्रुझवरील ड्रग्ज केस प्रकरणातील ज्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती त्यांनी ती सादर केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची भविष्यातही चौकशी करण्यात येईल. कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाचा (एनसीबी) पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांवरुन करण्यात आलेल्या चौकशीमध्ये समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
साईलने वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे 25 कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.
क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल याला आता मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.
वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आर्यनच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी २ वाजता आर्यनच्या जामीन आर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगातच काढावी लागणार आहे.