मास्को : रशियामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रशियात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे चाळीस हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर ११५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुतिन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून रशियामधील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले.
कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार केला आहे. दरम्यान जग या संकटातून काहीस सावरत आहे. यातच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीननंतर आता रशियाच्या राजधानीत देखील आजपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे. इतकंच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रशियामध्ये गेल्या २४ तासांत ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर ११५९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन सरकारने मॉस्कोमध्ये ११ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून लॉकडाऊन घोषित केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज गुरुवारपासून (२८ ऑक्टोबर) रशियामधील शाळा, महाविद्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट आणि बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाच्या ८५ प्रदेशांमध्ये जेथे परिस्थिती विशेषतः गंभीर आहे, तेथे आधी काम थांबविले जाऊ शकते आणि सुट्ट्या ७ नोव्हेंबरच्या पुढे वाढवल्या जाऊ शकतात. या काळात,मुख्य पायाभूत सुविधा आणि काही इतरांना वगळता बहुतेक सरकारी संस्था आणि खाजगी व्यवसायांना देखील काम थांबवावे लागेल.
कोरोनामुळे चीन देखील पुन्हा चर्चेत आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चीननं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून आता तर एका आख्ख्या शहरातच चीननं लॉकडाउन लागू केला आहे.
चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचं समोर आल्यानंतर चीननं एक मोठा निर्णय घेतला. या संपूर्ण शहरात चीननं कठोर लॉकडाउन लागू केला. जर फारच आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत.