Friday, May 20, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणा-या मुख्याध्यापकास अटक

Surajya Digital by Surajya Digital
October 28, 2021
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
5
फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवक सोमनाथ पिसेला पोलिस कोठडी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पहिले लग्न झालेले असताना मुलीच्या आई- वडिलांना फसवून दुसरे लग्न केल्या प्रकरणी मुख्याध्यापकास कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या मुख्याध्यापकाने दोघांना फसवले. कोरोनाच्या काळात मोचक्या लोकात दुसरं लग्न केले.

बापूसाहेब बाबासाहेब आडसूळ (रा.अंकोली, ता. मोहोळ, सध्या रा. भोसरे, ता. माढा) असे अटक झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
ते माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. याबाबत त्याच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीनेही त्या मुख्याध्यापका विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पहिल्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बापूसाहेबाचे मोहोळ तालुक्‍यातील अंकोली येथे 13 मे 2012 रोजी पहिले म्हणजे फिर्यादीबरोबर लग्न झाले होते. त्यावेळी बापू हा विनाअनुदानित शाळेत कामाला होता. कॉम्प्युटर सेंटर व इतर कारणासाठी सारखा माहेरहून पैसे आण असे तगादा लावत होता. पती, सासरे, सासू, दीर, जाऊ, नणंद व नंदवा यांनी मूल होणार नाही या कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सर्व गोष्टींना कंटाळून पहिली पत्नी जुलै 2018 साली माहेरी निघून गेली.

त्यानंतर पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसताना त्याने पहिले लग्न लपवून कोरोनाच्या साथीमुळे मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत परंडा तालुक्‍यातील वस्तीवर 30 मार्च 2021 रोजी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. बापूसाहेब, सासरे बाबासाहेब आडसूळ, सासू आवडाबाई आडसूळ, दीर अनिल आडसूळ, जाऊ दीपाली आडसूळ, नणंद सोनाली क्षीरसागर व लग्नासाठी मध्यस्थी करणारे चांगदेव कांबळे या सर्वांनी मिळून दुसऱ्या मुलीच्या आई- वडिलांना फसवले.

बापूसाहेबाचे दुसऱ्या फिर्यादीबरोबर लग्न केले आहे. फिर्यादीस वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस बापूसाहेबाच्या शोधात होते. त्याला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी दिली.

* फायटरने मारून वडीलाचे तोंड फोडले, मुलावर गुन्हा दाखल

सोलापूर – सासर्‍याला दिलेले पैसे मागून घे, असा सल्ला देणाऱ्या वडिलांना लोखंडी फायटरने तोंडावर मारून मुलाने गंभीर जखमी केले. ही घटना सांगवी (ता.अक्कलकोट) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली .

मधुकर मारुती रेड्डी (वय६० रा.सांगवी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यांचा मुलगा नागेश मधुकर रेड्डी आणि सून पुजा रेड्डी या दोघावर अक्कलकोट साउथच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मधुकर रेड्डी यांनी त्यांचा मुलगा नागेश याला तू सासर्‍याला दिलेले पैसे मागून घे. असे सांगितले होते तेव्हा मुलगा आणि सून या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी मुलाने थांब आता तुला बघतोच असे म्हणत कपाटातील लोखंडी फायटर काढून त्यांच्या तोंडावर मारून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* रेल्वेखाली तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : पत्रकार भवन जवळील पुला खाली धावत्या रेल्वेच्या धडकेने अर्जुन संदेश श्रीखंडे( वय २७ रा. विजापूर नाका झोपडपट्टी,नं २)  हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन श्रीखंडे हा रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी गेला होता. त्यावेळी रेल्वेच्या धडकेने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे.

* शेतकर्‍यांचे 40 हजाराचे सोयाबीन दोघांनी चोरले

बार्शी : तालुक्यातील दहिटणे येथील शेत वस्तीवरील सोयाबीनचे सुमारे 40 हजार रुपयांचे 18 कट्टे दोघांनी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत नितीन दासु लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेजारी गावातील ढोराळे येथील आनंद सतीश शिंदे , शाहीर सतीश शिंदे यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन लोखंडे हे आपल्या कुटुंबियासह जाधव वस्तीवर राहणेस आहेत. त्यांनी शेतात सोयाबिन ची रास करुन ते वाळवुन पोत्यात भरुन शेतातील वस्तीवरील आपल्या घरासमोरील अंगणात ठेवले आहे. मंगळवारी रात्री 09.30 वा. चे सुमारास नेहमीप्रमाणे ते जेवनखान करुन झोपले होते. रात्रौ सव्वा बाराच्या सुमारास मोटारसायकलीच्या आवाजाने ते जागे झाले. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाज्याला बाहेरुन कडी लावली असल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता म्हणुन त्यांनी मुलास दुसर्‍या दरवाज्याने बाहेर पाठवुन कडी उघडली.

त्यावेळी अंगणात ठेवलेले सोयाबीनचे 14 कट्यापैकी 2 कट्टे दिसुन आले नाहीत.  त्यानंतर त्यांनी व वस्तीवरील लोकांनी आजुबाजुस बाहेर येवुन पाहीले असता आरोपी मोटारसायकल वर सोयाबीनचे कट्टे घेवुन जात असताना दिसुन आले. पाठलाग केला असता ते पळुन गेले. त्यानंतर नागनाथ श्रीरंग जाधव यांचे वस्तीवरील अंगणात ठेवलेले सोयाबीनचे 16 कट्टे चोरीस गेल्याचे समजले.

* कोंबडवाडी येथे आत्महत्येचा प्रयत्न

कोंबडवाडी (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या दीक्षा दाजी सरक (वय१७)या अल्पवयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केली. काल मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. तिला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन वडीलांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.

* भावकीतील दोन गटात कुर्‍हाडीने हल्ला परस्पर विरोधी गुन्हा दाखल

उदनवाडी (ता.सांगोला) येथे भावकीतील शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठीने झालेल्या मारहाणीत सख्खे भाऊ जखमी झाले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद नोंदवून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शंकर दशरथ गारळे  (वय६० रा. झापाचीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या सख्खा भाऊ नाथा गारळे,भावजय संगीता आणि पुतण्या प्रवीण गारळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर नाथा दशरथ गारळे (वय ५६) यांनी दिलेल्या विरुद्ध फिर्यादीवरून त्यांचा भाऊ शंकर आणि त्यांची पत्नी बायनाबाई गारळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार कोष्टी पुढील तपास करीत आहेत.

Tags: #Headmaster #arrested #marrying #second #first #married#पहिले #लग्न #दुसरेलग्न #मुख्याध्यापक #अटक
Previous Post

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठोकडे तर ॲड. जोशी उपाध्यक्ष

Next Post

कोरोना वाढला; रशियाच्या राजधानीत लॉकडाऊन, आजपासून सर्व बंद

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कोरोना वाढला; रशियाच्या राजधानीत लॉकडाऊन, आजपासून सर्व बंद

कोरोना वाढला; रशियाच्या राजधानीत लॉकडाऊन, आजपासून सर्व बंद

Comments 5

  1. zortilo nrel says:
    7 months ago

    Some truly nice and utilitarian information on this site, as well I conceive the design and style has got excellent features.

  2. best swimming headphones says:
    4 months ago

    Wow, superb blog structure! How long have you been running a blog for? you made running a blog look easy. The total look of your website is fantastic, let alone the content material!

  3. gralion torile says:
    3 months ago

    Hello, you used to write great, but the last few posts have been kinda boring… I miss your great writings. Past several posts are just a little out of track! come on!

  4. dynamic qr code generator says:
    3 months ago

    of course like your web site but you have to take a look at the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality however I will surely come back again.

  5. tengeri szállítmányozás Europa-Road Kft says:
    3 months ago

    Good day! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and tell you I truly enjoy reading your posts. Can you suggest any other blogs/websites/forums that go over the same topics? Thanks!

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697