कुर्डूवाडी : भाजप पुरस्कृत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर कुर्डूवाडी बार्शी रोडवर रिधोरे येथे बापू गायकवाड या माजी सैनिकाने काळं आँईल फेकले. हे कृत्य सैनिकांच्या बाबतीत अश्लिल वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ रिधोरे येथील माजी सैनिकांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार परिचारक यांनी मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत सैनिकांच्या कुटूंबाबद्दल व पत्नीबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात सैनिकांनी आंदोलन केले होते. आंदोलनाचा केंद्रबिंदू कुर्डूवाडी व जिल्हा होता. परिचारक यांच्या आमदारकीवर त्यावेळी गदा आली होती. एक वर्षासाठी निलंबित देखील केले होते.
माढा तालुका माजी सैनिक संघटना व संभाजी ब्रिगेड या संघटनेने कुर्डूवाडी, माढा, करमाळा तालुक्यात परिचारक यांना येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे परिचारक यांच्या संकटात वाढ झाली होती.
सैनिकांविषयी आमदार परिचारक यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळेच आज तीन वर्षांनी पुन्हा त्यांच्या मोटारीवर काळे ऑईल टाकून राग व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा परिचारक यांची उमेदवारी घोषित केली आहे. हीसुध्दा आजच्या घटनेची पार्श्वभूमी मानली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शी येथे एका आयोजित कार्यक्रमास जाताना रिधोरे येथील रस्त्यावर आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीसमोर सायकल आडवी टाकून गाडी थांबवले. काही कळायच्या आत माजी सैनिक बापू गायकवाड यांनी एका हातात सळई तर दुस-या हातात काळ्या शाईची बाटली घेतली. तसेच पुढे जात गाडीच्या समोरील काचेवर बाटलीतून काळी शाई फेकली. आमदार परिचारक हे पुढेच बसले होते.
शाई फेकल्यानंतर गायकवाड यांनी यावेळी ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा दिल्या.त्यानंतर गाडी चालू करुन पुढे जावून थांबली. त्यातून काहीजण खाली उतरले. परिचारक गाडीतच होते. गाडीतून उतरलेल्या लोकांनी शाई फेकणा-या गायकवाडशी विचारणा केली, त्यातील एकाने गायकवाड यांचा फोटो काढला. यावर गायाकवाडने मोबाइल नंबर देऊका, अशी उलट विचारणा केली.
त्यानंतर सर्वजण गाडीत बसले, प्रशांत परिचारकांनीही सर्वांना चला, म्हटले. प्रशांत परिचारकांचाही व्हिडीओ काढत असताना परिचारकांनी गाडीतील पडदा ओढून घेतला. त्यानंतर गाडी निघून गेली. यावेळी गर्दी जमा झाली. प्रत्येकजण गाडीत कोण होते, काय झाले याची विचारणा करु लागले. ही बातमी आणि व्हिडिओ वा-यासारखे व्हायरल झाले.
” गेल्या काही 2 वर्षाखाली प्रशांत परिचारक यांनी माजी सैनिकांविषयी अपशब्द वापरले त्या निषेधार्थ मी हे आंदोलन केले. परिचारक यांना देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत अटक करुन फाशीची शिक्षा केली पाहिजे. जोपर्यंत यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही”
बापू गायकवाड – माजी सैनिक, रिधोरे