Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

“सरकारचा तेरावा घालणार; एसटी कर्मचारी मराठी नाहीत का ?’, गुप्त बैठक सुरु

Surajya Digital by Surajya Digital
November 22, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
“सरकारचा तेरावा घालणार;  एसटी कर्मचारी मराठी नाहीत का ?’, गुप्त बैठक सुरु
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात येत आहेत. आज आम्ही या सरकारचा तेरावा घालणार आहोत आणि उद्या एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनिल परब यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

परिवहन मंत्र्यांच्या मनात कामगारांबद्दल आस्था नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. शिवसेनेची लोक लाठ्या काठ्या घेऊन हा संप मोडायला निघाली आहेत. एस टी कामगार मराठी नाहीत का? असेही ते म्हणाले.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जात आहे. दरम्यान  कर्मचाऱ्यांच्या वतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारचा तेरावा घातला. यावेळी अनिल परब सारख्या सूर्याजी पिसाळाला आता सोडणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात गुप्त बैठक सुरू आहे. ही बैठक वरळीतील नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसटी संपाबाबत शरद पवार काय सल्ला देणार ?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काय खलबतं सरू आहे. गेल्या दीड तासपासून तिघांमध्ये चर्चा सुरू आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा येथील एसटी कर्मचारी आंदोलन करीत असताना परिवहनमंत्री म्हणतायत की, एसटीचे खासगीकरण करायला निघाला आहे. आता खासगीकरण करूनच दाखवा. कर्मचाऱ्यांनो लक्षात ठेवा सूर्याजी पिसाळ हा तुम्हाला त्रास द्यायला येणार आहे. त्याला पत्नीसह जाऊन साडी, चोळी द्यायचे. निलंबन झाले तर एकाच माणसाचे होणार आहे त्या माणसाचे नाव आहे अनिल परब. त्याचेच निलंबन होणार आहे.

राज्य सरकारने आता आमच्या संयमाचा अंत पाहू नये. एसटीच्या शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून तोडगा काढला जात नसल्याने एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आक्रमक पावित्रा घेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा तेरावा घातला.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना व ठाकरे सरकारवर  निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 45 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी जीव गमवला अशात त्यांच्याविरोधात दंड थोपटणे म्हणजे पुरूषार्थ नाही. स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांचं कौतुक करतील, असे पडळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Tags: #government #wear #thirteen #STemployees #Marathi #SadabhauKhot#सरकार #तेरावा #एसटीकर्मचारी #मराठी #खोत
Previous Post

हिटमॅन पर्व सुरू! सामना जिंकला, मालिका जिंकली

Next Post

अभिनंदनचे अभिनंदन ! देशाच्या खऱ्या ‘हिरो’ला वीरचक्र प्रदान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अभिनंदनचे अभिनंदन ! देशाच्या खऱ्या ‘हिरो’ला वीरचक्र प्रदान

अभिनंदनचे अभिनंदन ! देशाच्या खऱ्या 'हिरो'ला वीरचक्र प्रदान

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697