बार्शी : ऊसतोडीच्या कामासाठी दिलेली उचल, काम रद्द झाल्याने परत मागितली असता कामगाराने मुकादम आणि मुकादमीन यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील बाशिंगे प्लॉट येथे घडली आहे.
याबाबत जखमी अनिल नामदेव रगडे (रा. उपळाई ठोंगे ता. बार्शी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन आदिल समशोदिन शेख (रा. फुले मंगल कार्यालय, बाशिंगे प्लॉट, बार्शी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल रगडे आणि अमिना रहिम शेख हे पोपट बनसोडे याच्याकडे उसतोडीचे मुकादम म्हणुन काम करतात.
ते कामाच्या अंदाजाने संपर्कातील कामगारांना उस तोडीचे कामासाठी उचल देत असतात. त्याप्रमाणे त्यांनी 5 जून 2021 रोजी आदिल शेख यास त्याच्या पत्नीसह उसतोडीचे कामासाठी 75 हजार रुपये उचल दिली होती. तीन महिन्यापूर्वी ते काम रद्द झाल्याने त्यांनी पैसे परत मागितले होते. वारंवार पैसे मागितल्यानंतर त्यातील 51,000 रु परत मिळाले होते. उर्वरीत 24 हजार रुपयांची ते आदिल शेख याच्याकडे वारंवार मागणी करत होते.
मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे रात्रौ 09/15 वाजताचे सुमारास ते अमिना शेख असे दोघेजण आदिल शेख याचे घरी पैसे मागण्याकरीता गेले होते. त्यांनी पैसे मागितले असता आदिल याने मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत शिवीगाळ केली. मी पैसे देणार नाही म्हणुन मला त्यांना खाली पाडले व कंबरेला पाठीमागील बाजुस खोचलेला चाकु काढून वार केला.
यावेळी अमिना शेख सोडविण्यासाठी आली असता तिलाही ढकलून दिले. तिचे डावे पायाचे पिंडरीवर व डावे हाताचे दंडावर चाकुने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सांगोल्यात खाजगी एजंटवर एसीबीची कारवाई
सांगोला : तालुक्यातील मौजे गायगव्हान येथील गट क्र.41 मधील 32 आर जमिनीची होऊन नकाशा मिळवून देतो, असे सांगत 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील खाजगी एजंट बाळासाहेब केदार यांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याचे मौजे गायगव्हाण (ता. सांगोला) येथील गट क्रमांक 41 मधील 32 आर जमिनीची मोजणी होऊन नकाशा मिळवून देण्याकरता उप अधिक्षक, भुमी अभिलेख सांगोला येथे काम करत असलेले खाजगी एजंट बाळासाहेब एकनाथ केदार (रा. वासुद ता. सांगोला जि. सोलापूर) यांनी भूमी अभिलेख कार्यालय सांगोला येथील उपअधीक्षक त्यांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यामुळे आरोपी हे मोजणी नकाशा देण्याचे काम करीत असल्याचे भासवले. हा नकाशा देण्याकरिता तक्रारदार यांना 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडले.
यातील आरोपी बाळासाहेब केदार यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरो सोलापूरचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिली.
ही कार्यवाही ही राजेश बनसोडे पोलिस अधीक्षक एसीबी पुणे, सुरज गुरव अपर पोलिस अधीक्षक एसीबी पुणे, सुहास नाडगौडा , अप्पर पोलिस अधीक्षक एसीबी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून संजीव पाटील पोलीस उप अधीक्षक सोलापूर यांच्या नियंत्रणाखाली सापळा अधिकारी उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर तसेच या कारवाईमधील सापळा पथकात पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, प्रमोद पकाले, गजानन कीनगी, नेम.एसीबी सोलापूर यांनी पार पाडली.