मुंबई : भारताने न्यूझीलंडविरुद्धची मुंबई कसोटी जिंकली आहे. भारताने या सामन्यात 372 धावांनी विजय मिळवला. सोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली. मुंबई कसोटीत 540 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 167 धावांवर आटोपला. तर पहिल्या डावात न्यूझीलंडने 67 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. तसेच दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला.
मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. 540 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 167 धावांत आटोपला.
टीम इंडियानं या 5 विकेट्स फक्त 45 मिनिटांमध्ये मिळवत न्यूझीलंडचा 372 रनने मोठा पराभव केला. टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 540 रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 167 रनवर ऑल आऊट झाली.
टीम इंडियात 4 वर्षांनी परतलेला मुंबई इंडियन्सचा स्पिनर जयंत यादव चौथ्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं झटपट विकेट्स घेत भारतीय टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबरच टीम इंडियाने ही टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. जयंत यादवने सोमवारी सकाळी झटपट 3 विकेट्स घेत न्यूझीलंडचा पराभव जवळ आणला.
CHAMPIONS 👏👏
This is #TeamIndia's 14th consecutive Test series win at home.#INDvNZ @Paytm pic.twitter.com/FtKIKVCzt8
— BCCI (@BCCI) December 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं या टेस्टमधील एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पण या कामगिरीनंतरही न्यूझीलंडची नामुश्की त्याला टाळता आली नाही. एजाजने पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या.
मुंबई टेस्टमध्ये विक्रमी 14 विकेट्स घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंनी साथ दिली नाही. खराब अंपायरिंगवर विराट कोहली संतापला, भर मैदानात म्हणाला… टीम इंडियाच्या 325 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची पहिली इनिंग फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. कोणत्याही टीमचा टेस्ट क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रनवर इनिंग घोषित केली. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला स्थिराऊ दिले नाही. पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढणाऱ्या मयंक अग्रवालनं देखील टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.
मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून 2021 मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने वळण घेतले आहे. आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. आयसीसी दर बुधवारी आपली क्रमवारी अपडेट करते. त्यानंतरच क्रमवारीतील बदल दिसून येतो. भारताने कानपूर कसोटी जिंकली असती, तरी त्यांनी पहिला क्रमांक पटकावला असता.
* 14 विकेट्स ! एजाज पटेलने इतिहास रचला
मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने 10 विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात एजाजने भारताचे 4 फलंदाज बाद केले. 225 धावा देऊन एकूण 14 विकेट्स घेणारा एजाज टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारताविरोधात एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी 41 वर्षांआधी इंग्लंडच्या इयॉन बॉथमने भारताविरोधात एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या.