सोलापूर – आजारी असल्याने अभ्यास झाला नाही, त्यातून परीक्षेचा पेपर अवघड गेल्याच्या तणावातून एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना शेळगाव (आर) तालुका बार्शी येथे शनिवारी ( ता. ४) घडली. काल रविवारी दुपारी उपचारादरम्यान सोलापुरात मृत्यू झाला.
सानिका समाधान निकम (वय १५ रा. शेळगाव) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. ती शेळगाव येथील शाळेत इयत्ता ८ वी इयत्तेत शिकत होती. गेल्या आठवड्यात तिची तब्येत बिघडल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर पुन्हा ती शाळेला जाऊ लागली.
शनिवारी सकाळी परीक्षा दिल्यानंतर ती वडिलांसोबत घरी येत होती. त्यावेळी तिने पेपर अवघड गेल्याचे सांगितले. घरी आल्यानंतर तिने पिकावर फवारणीचे द्रव प्राशन केली. त्यानंतर तिला श्रीकांत जगदाळे (मामा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ती रविवारी (ता.५) दुपारी मरण पावली.
मयत सानिका हिच्या पश्चात एक बहिण, एक भाऊ आई वडील असा परिवार आहे. तिचे वडील समाधान निकम हे शेती व्यवसाय करतात. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* खंडाळी येथे घरात घुसून मारहाण; महिलांसह पाच जणांवर गुन्हा
खंडाळी तालुका माळशिरस येथे फोनवरून मुलीसोबत बोलण्याच्या संशयावरून घरात घुसून लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत दत्तात्रय बाळासाहेब शिंदे (वय २१ रा. खंडाळी) हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळच्या सुमारास घडली.
त्याच्या फिर्यादीवरून वेळापूरच्या पोलिसांनी मनीषा लावंड, महेश लावंड, गणेश लावंड, माया लावंड, आणि दीपक घाटेराव (सर्व रा.खंडाळी) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार करे पुढील तपास करीत आहेत.
* ४२ हजाराची सळई पळवली
सांगोला येथील वासुद रोडवर राहणाऱ्या अमर दशरथ जाधव यांच्या घरासमोर ठेवलेली ७००किलो लोखंडी सळई चोरट्यांनी पळविली. ही चोरी शुक्रवारी (ता. ३) पहाटे घडली. चोरीस गेलेल्या सळईची किंमत ४२ हजार इतकी आहे. अशी नोंद सांगोला पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मागील भांडणाचा राग, लाकडी काठी मारहाण
सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी कालिदास पंडित राठोड (रा. बसवेश्वर नगर, तांडा देगाव उत्तर सोलापूर) यास अनिल मोहन राठोड, अविनाश मोहन राठोड, आणि मोहन राठोड या तिघांनी मिळून लाकडी काठीने मारून जखमी केले. शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. सलगर वस्ती पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
* चोरट्याने कुलूप तोडून ४१ हजारांचा ऐवज केला लंपास
सोलापूर : कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अहिल्यादेवी नगर होडगी रोड सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अद्वैत विश्वनाथ लवटे (वय-३२,रा. अहिल्यादेवी नगर रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे कामावर गेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लोखंडी स्लायडिंग शटरला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, दीड हजार रुपये किमतीचे चांदीचे मेडल व दहा हजार रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली.
* अज्ञात चोरट्याने पळविली दुचाकी
सोलापूर – कोणीतरी अज्ञात चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दुचाकी चोरून नेल्याची घटना दि.२ डिसेंबर रोजी टॉकीज सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सागर बुरणप्पा पेद्दे (वय-२४,रा. कोनापुरे चाळ रेल्वे लाइन्स,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची वीस हजार रुपये किमतीची एम.एच.१३.सीसी.५७५२ या क्रमांकाची दुचाकी हँडल लॉक करून प्रभात टॉकीज येते लावली होती.त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मोटरसायकल मुद्दामून लबाडीने चोरून नेली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली, पुढील तपास पोलिस नाईक पैकेकरी हे करीत आहे.