सोलापूर / पंढरपूर : क्रिकेट सामान्या आपल्या आगळ्यावेगळ्या अंपायरिंगने भारताच्या एक अंपायरने धमाल केली आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा अंपायर महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या दीपक नाईकनवरे यांचा आहे. या दीपकची भुरळ क्रिकेटमध्ये देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरला पडली आहे.
सोशल मीडियावर दीपक नाईकनवरेची पंढरपूरच्या बिली बाउडेन सोबत तुलना होत आहे तर या डीएन रॉक्स या टोपण नावाने पुढे आलेल्या दीपक नाईकनवरे यांचेवर सध्या संपूर्ण सोशल मेडिया फिदा झाल्याचे दिसत आहे .
त्यांच्या वेगळ्या शैलीच्या अंपायरिंगचे तर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन देखील फिदा झाले आहे. मायकल वॉनने ट्विटरवर दीपकच्या अंपायरिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच लिहिले आहे की आम्ही सर्व यांना इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल एलीट पॅनलमध्ये बघू इच्छित आहे.
म्हणतात की कलाकार हा कलाकारच असतो. कारण तो नृत्यकलाकार परंतु सध्या क्रिकेट सामन्यामध्ये अंपायरची भूमिका वटविणाऱ्या तरुणाने आपल्या अफलातून शैलीने इंग्लंडचा फलंदाज मायकल वॉन पाठोपाठ क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची देखील वाहवा मिळवली आहे.
शालेय जीवनापासून नृत्याची आवड असणाऱ्या दीपकने विविध शहरात नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसे पटकाविली आहेत. आपल्या नृत्याच्या जोरावरच त्याने आठ वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिनीवरील प्रसिध्द डान्स महाराष्ट्र या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी त्याने उपस्थित दिग्गज मराठी कलाकारांची शाब्बासकी देखील मिळवली होती. नृत्य हे दीपकचे सर्वस्व आहे. यामुळेच त्याने तीन वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला आपल्यातील नृत्य कलेची जोड देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात लॉकडाउनमुळे दोन वर्षे क्रिकेटचे सामनेच झाले नाहीत. मात्र, मागील काही महिन्यांपासून राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्पर्धा भरत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका सामन्यात गोलंदाजाने वाइड चेंडू टाकताच दीपकने आपल्या अनोख्या शैलीत डोक्यावर उभे राहून दोन पाय पूर्ण सरळ करीत खूण केली. दोन्ही हात पसरून वाइड चेंडूची खूण केली जाते, परंतु दीपकने उलटे होत दोन पाय सरळ करून दाखविल्यामुळे उपस्थितांनी एकच टाळ्यांचा गजर केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर अनोख्या अंपायरिंगची मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा फलंदाज मायकल वॉन यानेदेखील आपल्या ट्रिटरवर हा वाइड चेंडूचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याच्याखाली दीपकला उद्देशून या चम्पयनला आम्हाला आंतरराष्ट्रीय अंपायरच्या पॅनलमध्ये सामील झालेले पाहायला आवडेल, असे वाक्य टाकले आहे. तर दोन दिवसांपूर्वी क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने देखील आपल्या ट्विटरवर दीपकच्या वाइड
चेंडू टाकल्यानंतरचा फोटो वापरला आहे. व प्रसिध्द आंतरराष्ट्रीय अंपायर बिली बाऊडन यान उद्देशून यावर तुमच मत काय आहे, असा प्रश्न केला आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/1470366195048013831?s=19
दीपकला क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट अंपायर बिली बाऊडन हे त्याचे प्रेरणास्थान, ज्याप्रकारे बाऊडन अंपायरिंग करताना हातवारे करायचे त्याप्रमाणे दीपक ही हटके हातवारे करतो. त्याच्या या अनोख्या अदांची आणि कलागुणांची आजवर महाराष्ट्रात वाहवा होत होती. आता त्याच्या या अपायरिंगची दखल मायकल यांनी घेतली गेल्याने दीपकला आभाळ ठेंगणे झाले आहे.
खास करुन व्हाईड बॉल पडल्याची दिपकची स्टाईल मायकलला खूपच अधिक भावली आहे. दीपक हा व्यावसायिक क्रिकेट अंपायर आहे. राज्यभरातील विविध क्रिकेट सामन्यामध्ये तो अपायरिंग करायला जात असतो. तो जिथे जातो तेथील क्रिकेट प्रेमींची तो आपल्या हटके स्टाईलने मन जिंकत असतो. आता तर सातासमुद्रापार दिपकच्या अपायरिंगची वाहवा पोहचली असून त्याच्या या हटके अंदाजाची आता सर्वानाच भुरळ पडली आहे.
क्रिकेटकडे आता खेळ कमी मनोरंजन म्हणूनच अधिक पाहिले जात आहे. यातूनच टी-२० आता तर दहा ओव्हरचे सामने परदेशात गाजत आहेत. अशा स्पर्धेत मनोरंजनच अधिक असल्यामुळे दीपकसारख्या अनोख्या शैली असलेल्या अंपायरची नक्की गरज आहे. दीपकचे हे कौशल्य पाहून येत्या काळात आयपीएल किंवा दहा ओव्हरच्या सामन्या अपायरिंग करताना नक्कीच दिसून येईल.
* खेळापेक्षा अंपायरिंगचीच चर्चा
क्रिकेटमध्ये अंपायर हा अत्यंत तठस्थ आणि ढिम्म चेहऱ्याने आपले काम बजावत असतो. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर बिल बाऊडन हे आपल्या अनोख्या अंपायरिंगच्या शैलीमुळे प्रसिध्द आहेत. दीपकने मात्र त्यांच्याही पुढे जाऊन पळत पळत चार रनची खूण करणे, नाचत नाचत सिक्स देणे तसेच आउट देताना देखील वेगळीच शैली विकसित केली आहे. नृत्य कलाकार असल्याने ते मैदानावरच नृत्य करीत क्रिकेटचे निर्णय देतो. तर कधी प्रेक्षकांपर्यंत पळत जात त्यांना नाचवितो देखील. यामुळे क्रिकेट सामन्यापेक्षा दीपकची अनोखी शैली पाहण्यास लोक मैदानात गर्दी करतात. राज्यभरात होणाऱ्या विविध स्थानिक स्पर्धेसाठी त्यास आता मोठी मागणी आहे.