पणजी : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने काल बुधवारी (ता.29 ) नवीन निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत कॅसिनो, सिनेमा हॉल, सभागृह, एंटरटेनमेंट पार्क येथे फक्त 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
या ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणे किंवा लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे लसीकरण झालेल्या आणि लक्षणं नसलेल्या लोकांनाच गोव्यात प्रवेश दिला जाणार आहे.
परदेशातून गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णलयात भरती करण्यात येत आहे. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी परराज्यातील नागरीक गोव्यात दाखल होऊ लागल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच काही निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते की, ”गोवा पर्यटन राज्य असल्याने योग्य तात्काळ निर्बंधाचा विचार करणे घाईगडबडीचे होईल.”
Goa Govt announces new restrictions to contain #COVID19 spread
Casinos, cinema halls, auditoriums, river cruises, water parks & entertainment parks to operate at maximum of 50% capacity
Fully-vaccinated or those possessing negative COVID certificate to get entry into the state pic.twitter.com/RLr8HpA1WQ
— ANI (@ANI) December 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किंवा 24 तास कोविड टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह असल्यास त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच गोवा मध्ये कसिनो, सिनेमा हॉल, ऑडिटोरियम, रिव्हर क्रुझ,वॉटर पार्क अशी मनोरंजनाची ठिकाणं 50% क्षमतेनेच सुरू ठेवली जाणार आहे.
इंग्लंड आणि शारजहा येथून गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी ५ जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्या लाळेचे नमुने कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या चाचणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
पणजी राज्यसभेचे खासदार तथा तृणमूलचे नेते लुईझिन फालेरो हे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यासह त्यांचे सहकारी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन हेही कोरोनाबाधित झाले आहेेत. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याची सूचना केली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असल्याने लुईझिन फालेरो सध्या नवी देहली येथे आहेत.