वॉशिंग्टन : अमेरिकेत अतिशय विचित्र घटना घडली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये पाऊस चालू असताना चक्क हवेतून मासे जमिनीवर पडले. लोकांना सुरूवातीला गारा पडत असल्याचे वाटले, पण पाऊल थांबला असता त्यांना माशे पडल्याचे दिसले. दरम्यान समुद्रातून आलेले चक्रिवादळ जमिनीवर आदळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे टेक्साससह जगभरातले लोक चकीत झाले आहेत. पाऊस सुरु झाले, तेव्हा लोकांना वाटले की गारा पडत आहेत. पाऊस थांबल्यावर त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, चक्क शेकडो मासे हवेतून पडल्याचे अनेकांनी पाहिले. त्यांना हा प्रकार पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेवर अमेरिकेतील एका वृत्तपत्राने स्थानिकांच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत. टायर विक्रेता टॉम यांनी सांगितले, की त्याने स्वतः हवेतून माशांचा पाऊस पडताना पाहिला. या विक्रेत्याच्या दुकानासमोर 25-30 मासे हवेतून मासे पडले होते.
आधी जेव्हा हा पाऊस सुरू झाला, तेव्हा स्थानिकांना हा पाऊस म्हणजे गारांचा असावा, असं वाटलं. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडलं नाही. पण, जेव्हा हा पाऊस थांबला तेव्हा त्यांनी पाहिलं की आकाशातून गारा नव्हेत तर चक्क मासे पडले होते.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हे मासे 6 ते 7 इंचाचे होते. संपूर्ण शहरात माशांची दुर्गंधी पसरली होती. वाऱ्यासोबत तो गंध वेगाने शहरभर पसरला होता. या माशांची डोकी फुटली होती. कुणीतरी खूप उंचावरून फेकल्यासारखे ते दिसत होते. जेव्हा ते पडले, तेव्हा ते जिवंत असावेत. कारण क्राँक्रिटच्या पृष्ठभागावर ते काही सेकंद तडफडले आणि मृत पावले, असं ही घटना पाहणाऱ्या एका नागरिकाचं म्हणणं आहे.
स्थानिकांनी या माश्यांची विल्हेवाट लावण्याची एक नामी शक्कल शोधली. त्यांनी ते मासे जमा करून घेतले. या माशांच्या मासांचा गळ म्हणून वापर करून मोठा मासे पकडण्यासाठी त्याचा वापर केला आहे.
* कशामुळे पडला असा पाऊस ?
वास्तविक हा असा पाऊस पडण्यामागे एक भौगोलिक कारण आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये चक्रीवादळं यायचं प्रमाण अधिक आहे. ही चक्रीवादळं समुद्रातून जमिनीच्या दिशेने येतात. त्यामुळे समुद्राच्या वरच्या भागात पोहोणारे मासे, खेकडे, बेडूक आणि तत्सम अन्य प्राणी या चक्रीवादळात सापडतात. जेव्हा हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने येतं, तेव्हा त्याची क्षमता कमी होते आणि पावसाच्या रुपाने चक्रीवादळात सापडलेले जीव जमिनीवर पडतात.