Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सवतीला पळवून लावल्यामुळे पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

Surajya Digital by Surajya Digital
January 7, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
2
सवतीला पळवून लावल्यामुळे पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : सवतीला नांदू दिले नाही. तिला पळवून लावले, याचा राग मनात धरुन बायको ( wife ) रात्री (night) झोपेत असताना तिचा गळा दाबून खून केल्याचे सिध्द झाल्याने लक्ष्मण जगू शिंदे (रा. नांदूर ता. केज जि. बीड) यास येथील सत्र न्यायालयाने (court)  जन्मठेपेची व 25 हजार रु दंडाची व दंड (penalti) न भरल्यास सहा महिने (six months) सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

12 जून 2018 रोजी ही घटना घडली होती. जुलै 2018 पासून आरोपी तुरुंगात आहे.  वैराग पोलीस (virag police ) ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र (Indictment)  दाखल केले होते. आरोपीने आज न्यायालयात न्यायाधीशांसोबत उध्दट वर्तन ( Rude behavior) केले. त्यास वकिल नेमावयाचा आहे काय? शिक्षेबाबत काय म्हणणे आहे? अशी विचारणा केल्यावर त्याने उध्दटपणे उत्तर देत फाशीची ( Execution) शिक्षा द्या, असे म्हणत आरडाओरडा केला.

अतिरिक्त सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी हा निकाल (result) दिला. सरकार पक्षातर्फे ऍड. दिनेश देशमुख यांनी काम (work) पाहिले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

वैराग येथील डॉ. शिरीष भूमकर यांच्या शेतामध्ये विहीरीचं काम करण्यासाठी लक्ष्मण शिंदे आपल्या कुटुंबासह आला होता.  त्याच्यासोबत त्याच्या सासुरवाडीचीही मंडळी होती. शेतात पाल ठोकून ते रहात होते. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण शिंदे याने पत्नी सविता हिस अंधारात ठेवून मुरुड तालुक्यातील एका मुलीबरोबर विवाह (marriage) केला होता.

हा विवाह उघडकीस आल्यानंतर सविता हिने त्या मुलीला नांदू दिले नाही, तिला पळवून लावले. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप वादावादी ( Controversial) झाली होती. दुसर्‍या पत्नीच्या माहेरकडील मंडळीलाही लक्ष्मण शिंदे हा विवाहित (married)) असल्याचे माहिती नव्हतं. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याने ते ही नाराज ( Angry) झाले होते. दुसरं लग्न फसल्याचा व त्याचा झालेला खर्च वाया गेल्याचा त्याला राग होता. त्यामुळे नवरा-बायकोत वारंवार भांडण (Frequent quarrels)  होत होते. त्यानंतर सविता रात्री झोपेत असताना तिचा गळा दाबून (By pressing the throat ) तो फरार झाला.

पहाट (Dawn)  झाल्यानंतर आपली मुलगी उठली नाही. नात बराच वेळ रडत आहे, म्हणून शेजारीच पालात राहणारी तिची आई (mother)  सविता हिच्या पालात आली. तिने सविताला उठविण्याचा प्रयत्न केला असता ती उठली नाही. त्यामुळे तिला संशय (Doubt) आला. सविताच्या गळ्याजवळ दाबल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे तिने आरडाओरडा केला. तेव्हा सविताचा खून झाल्याचे उघड झाले. स.पो.नि. धनंजय ढोणे यांनी फरार (Absconding)  शिंदे यास  शिताफीने पकडले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी 11 साक्षीदार तपासले. गुन्हा घडला तेंव्हा आरोपी आणि मयत हे दोघेच पालात होते हे सिद्ध झाले. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा ( Evidence) आणि वैद्यकीय अधिकारी (Medical officer) यांची साक्ष (Evidence) महत्वाची ठरली.

Tags: #Life #imprisonment #murderer #wife #kidnapping#सवती #पळवून #पत्नी #खून #करणार्‍यास #जन्मठेप
Previous Post

16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा

Next Post

मोहोळमध्ये अपघातात दोन ठार, निर्माण फर्टिलायझर्स कंपनीत बारा कामगारांना श्वसनाचा त्रास

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मोहोळमध्ये अपघातात दोन ठार, निर्माण फर्टिलायझर्स कंपनीत बारा कामगारांना श्वसनाचा त्रास

मोहोळमध्ये अपघातात दोन ठार, निर्माण फर्टिलायझर्स कंपनीत बारा कामगारांना श्वसनाचा त्रास

Comments 2

  1. a Maria - Dance,Maria says:
    5 months ago

    a Maria – Dance, Maria [Official Music Video]! Click Here: https://youtu.be/E5DYlF6_x2U

  2. best handheld sewing machine says:
    4 months ago

    I will immediately grasp your rss as I can not find your e-mail subscription link or e-newsletter service. Do you’ve any? Kindly allow me recognize so that I may subscribe. Thanks.

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697