नवी दिल्ली : नवी दिल्लीतील इंडिया गेट India get येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. ‘संपूर्ण देश सध्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की नेताजींची संपूर्ण ग्रेनाईटनं तयार करण्यात येणारी भव्य प्रतिमा इंडिया गेट येथे उभारली जाईल’, असं मोदींनी ट्विट modi tweet केलं.
पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच येत्या 23 जानेवारी रोजी नेताजींच्या जंयतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया गेट आणि राष्ट्रीय स्मारकच्यामध्ये एक रिकामी चबुतरा आहे. याच ठिकाणी नेताजींचा पुतळा उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा चबुतरा रिकामी आहे. याआधी या चबुतऱ्यावर जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. १९६८ साली तो चबुतऱ्यावरुन हटवण्यात आला आणि तो कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आला होता. तेव्हापासून हा चबुतरा रिकामीच आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, यंदा देश नेताजीची 125 वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला नेताजींचा भव्य पुतळा बसवला जाईल. जोपर्यंत नेताजींचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम hologram पुतळा तिथेच राहणार असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. Prime Minister Narendra Modi’s big announcement; A huge statue of Netaji Subhash Chandra Bose will be erected
देशाच्या इतिहासात वीर जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात आली आहे. भारताच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ गेल्या 50 वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असलेली ‘अमर जवान ज्योती Immortal Jawan Jyoti’ राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. त्यानंतर विरोधकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी mp raul gandhi मोदींवर टीका केली आहे. हा वाद सुरू असतानाच आता पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Defense Minister Rajnath Singh यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले असून नेताजींचा पुतळा इंडिया गेटवर बसवल्याने देशातील तरुणांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होईल, असे सिंह म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींचा हा निर्णय म्हणजे नेताजींच्या कार्याचा सन्मान असल्याचे राजनाथ यांनी सांगितले.