मुंबई : वसई-विरार vasai- virar परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेंटिस्ट असलेली महिला चक्क खासगी रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी महिला आणि तिचा पती दोघेही फरार Absconding झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीला बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती.
येथील दंतचिकित्सक असलेली महिला डॉक्टर चक्क खासगी रुग्णालयात private hospital गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी महिला डॉक्टर आणि तिचा पती असे दोघेही फरार झाले आहेत. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच या महिलेच्या पतीला बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील डॉ. आरती वाडकर dr. Arati wadkar या दंतचिकित्सक Dentist आहेत. मात्र, असे असतानाही त्या आपला पती सुनील वाडकर याच्या रुग्णालयात चक्क गर्भपात केंद्र चालवत होत्या.
या प्रकरणात विरार पोलिसांत तक्रार complete दाखल झाली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. दोघेही पती आणि पत्नी यांनी पळ काढला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. डॉ. आरती वाडकरचा पती डॉ. सुनील वाडकर याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बोगस वैद्यकीय पदवी प्रकरणात अटक केली होती. Pratap, a woman doctor, runs an abortion center in Vasai despite being a dentist
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुन्हे शाखेच्या crime नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने व वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी संयुक्त कारवाई करून विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर विरार पोलिसांनी डॉ. वाडकर यांना अटक केली होती.
डॉ. वाडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पदवी खरी आहे की खोटी याचा तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. त्यानंतर आता पत्नीही अनधिकृतपणे गर्भपात केंद्र चालवत असल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता हे दोघेही पती आणि पत्नी यांनी पोबारा केला आहे.
□ धक्कादायक ! महापालिकेत होते वैद्यकीय अधिकारी
धक्कादायक म्हणजे सुनील वाडकर हा वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या पदावरही काही काळ कार्यरत होता. डॉ. सुनील वाडकर dr.sunil wadkar हे वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी होता. सध्या तो विरार महामार्गावर ‘हायवे’ highway आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ Nobel अशी दोन खासगी रुग्णालये private hospital चालवतात. त्याची वैद्यकीय पदवी बोगस bogus असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती.
त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक Unethical human trafficking prevention शाखेच्या पथकाने आणि वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव dr. Yojana jadhav यांनी कारवाई करत त्यााल अटक केली होती. आमच्याकडे डॉ. वाडकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन तपासणी केली. त्यावेळी डॉ. वाडकर यांच्याकडे एमबीबीएसची पदवी MBBS degree नसल्याचे समोर आले, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली होती.