सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. डिसले गुरूजी जिल्हा शिक्षण संस्था वेळापूर येथे नियुक्तीच्या ठिकाणी 3 वर्ष गैरहजर होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईस सुरुवात करण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी दिली. यानंतर नोकरी सोडण्याचा इशारा डिसले गुरुजींनी दिला आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झालीय. या स्कॉलरशिपसाठी डिसले गुरुजी यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. ही सुटी प्रशासनाकडून मंजूर केली नाही. त्यामुळेच ते नाराज होते. आता रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
रणजित डिसले गुरुजी यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. जेव्हा डिसले गुरुजींच्या संदर्भात बातम्या आल्या त्यावेळी सोलापूरच्या सीओशी बोलणे झाले. त्यांना आम्ही सांगितले की, डिसले गुरुजींना शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे आहे तर, त्यांना तातडीने परवानगी द्यावी, यासाठी काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्यांना लवकरच परवानगी मिळेल, असे गायकवाड यांनी सांगितलंय. Disley Guruji’s way to America is clear, now the Minister of Education will investigate
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यामुळे सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांनी दिलेत. याशिवाय वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात रणजित डिसले यांना फोन केल्याचे देखील सांगितले आहे. याशिवाय हा वाद नेमका कसा उफाळून आला आणि यामागील नेमके कारण काय आहे? याबाबत चौकशी करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच रणजितसिंह डिसले यांच्यासह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. गुरूवारी जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितले गेलं आणि इतरही गंभीर आरोप केले.
□ रणजितसिंह डिसलेंचे प्रशासनावर आरोप
रणजितसिंह डिसले सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पैशाची मागणी केली, एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी वृत्तवाहिनीला सांगितलंय. वृत्तवाहिनीला बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतंय.
डिसले गुरूजी म्हणाले, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क साधला याचा राग मनात धरला होता. राज्यपालांशी थेट संपर्क झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा ‘वारे’ गुरूजी करू असा निरोप दिला होता. त्यामुळे अशा वातावरणात या व्यवस्थेत राहणे शक्य नाही. झोपही शांत लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित असून आपला ‘वारे’ सर होण्याअगोदर बाहेर पडणार असल्याचे म्हटले होते.
“शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रजा मंजूर करण्याचे आदेश दिल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार मानतो. अमेरिकेला जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता होणार आहे. फुल स्कॉलरशिपच्या संधीला मी मुकणार नाही, त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो”
– रणजितसिंह डिसले सर