पुणे : कोरोनामुक्त गाव corona free village करण्यासाठी जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने BJS राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान फायदेशीर ठरत आहे. याच अभियानाची पुणे विभागातही अंमलबजावणी करावी आणि यामध्ये गावकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी केले आहे. तसेच या अभियानात प्रथम बक्षीस म्हणून 50 लाख, तर द्वितीय 25 लाख आणि तृतीय बक्षीस 15 लाखाचे देण्यात येणार आहे.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविकात मुथा यांनी मोहिमेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील 550 गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली असून त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नाने यशस्वी होत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताचे सूत्र युवकांच्या हाती जात असून त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. Kovidmukta Gaon Abhiyan of Indian Jain Association, first prize of Rs. 50 lakhs
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबतचे गांभीर्य लक्षात आले आहे.
दोन वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बिजेएसच्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल.
कोविडमुक्त 44 गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोविडमुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.