Senior journalist Dinkar Raikar passes away
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर (वय ८१) यांचे गुरूवारी पहाटे मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी nanavati उपचार सुरु होते. पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आज today शुक्रवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी पत्रकारितेत journalism ५० वर्षांहून अधिक काळ काम work केले. दिनकर रायकर हे लोकमत lokmat वृत्तपत्राचे समन्वयक संपादक होते. गेली काही वर्षे ते दैनिक लोकमतमध्ये समूह संपादक कार्यरत होते. रायकर यांची गुरुवारी रात्री आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह RT-PCR test negative आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यातच निधन झाले.
दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोना Dengue and corona झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला मात्र फुफ्फुसांचा संसर्ग जास्त होता. त्यामुळे नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Senior journalist Dinkar Raikar passes away
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांनी रायकर यांना आदरांजली वाहिली, ते म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार, साक्षेपी संपादक दिनकर रायकर यांचे निधन दुःखदायक आहे. जगन्मित्र अशी ओळख असलेले रायकर पत्रकारितेत शब्दांची जुळवणूक करताना माणसंही जोडत गेले ! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचे ट्विट tweet त्यांनी केले आहे.
□ दिनकर रायकर यांची कारकीर्द
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून जास्त अनुभव experience होता. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. तसेच गेली काही वर्षे ते लोकमतचे समूह संपादक Group editor म्हणूनही कार्यरत होते.त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद aurangabaad आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांना पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते.
■ सुराज्य परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली