सोलापूर जिल्हा परिषदेला करावे लागले सुटीच्या दिवशीही कामकाज
सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशीपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना डिसले गुरुजींना स्कॉलरशीपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, यासाठी निर्देश दिले आहेत. तसेच डिसले गुरुजींवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजींना प्रशासनाने 153 दिवसांची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचा मार्ग सुकर नाही तर अगदी मोकळा झाला आहे. मात्र त्यांनी प्रशासनावर केलेले आरोप आणि प्रशासनाने गुरूजीवर ठेवलेला ठपका यामुळे काही दिवस चर्चा चांगलीच रंगली होती. समाजमाध्यमावर डिसले गुरुजींना चांगलाच पाठिंबा तर थोडासा विरोधही दिसून आला.
सोलापूर शिक्षण विभागाने आज रविवारी सुटीच्या दिवशी सायंकाळी ही माहिती दिली. या माहितीत डिसले यांना अमेरिकन सरकारच्या Fullright Foreign Scholarship Board या स्कॉलरशिपसाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात आल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये त्यांना 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रजा देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलं आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO श्री.दिलीप स्वामी साहेबांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे.
माननीय @VarshaEGaikwad मॅडम, आदरणीय @RealBacchuKadu साहेब,यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो.— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) January 23, 2022
153 days leave granted; Open the way for Disley Guruji to go abroad for scholarship
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
डिसले यांनी रजा मंजूर झाल्यानंतर ट्वीट करत सरकारचे आभार मानले आहेत. ‘सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे. वर्षा गायकवाड, बच्च कडू यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो’, डिसले यांनी म्हटलं आहे.
रणजितसिंह डिसले यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे, अभिनेते सयाजी शिंदे आणि बच्चू कडू यांनी धीर दिल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. ‘कठीण काळातही आस्थेने चौकशी करून रजेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून मानसिक आधार दिल्याबद्दल सुप्रिया सुळे, सयाजी शिंदे, बच्चू कडू यांचे मनापासून धन्यवाद’, डिसले यांनी म्हटलं होतं.
शिक्षण विभागाने रविवारी म्हणजेच आज सुट्टीच्या दिवशीही काम करत त्यांच्या रजेचा अर्ज मंजूर केला. त्यांना 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच पाच महिन्यांसाठी (153 दिवस) रजा देण्यात आली आहे.
‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्यानंतर डिसले हे प्रसिद्धीच्या झोतात आले. सध्या त्यांना स्कॉलरशिपच्या कामासाठी परदेशात जायचं होतं. मात्र, रजेच्या अर्जात त्रुटी काढण्यात आल्याने त्यांची परदेश दौरा अडचणी आला होता. त्यांच्याबद्दल एक चौकशी अहवाल देखील समोर आला होता.
2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र, या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते, असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झाला होता.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना स्कॉलरशिपसाठी परदेशात पाठवण्यात यावे, असे निर्देश दिले. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण विभागाने रविवारी (23 जानेवारी) सुट्टीच्या दिवशी काम करुन डिसले गुरुजींची रजा मंजूर केली आहे.