Action against 11 priests of Tulja Bhavani temple, tuljapur
तुळजापूर : बेशिस्त वर्तन केल्याचे सिद्ध झाल्याने तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजाऱ्यांवर कारवाई action करण्यात आली आहे. गाभाऱ्यात प्रवेशाला बंदी असतानाही प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो photo काढणे, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली. तसेच या पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी No entry करण्याचा निर्णय Decision जिल्हाधिकाऱ्यांनी DM घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष President of Tulja Bhavani Mandir Sansthan आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावरकर Collector Kaustubh Divegavarkar यांनी ही कारवाई केली आहे. तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांनी गैरवर्तन Abuse केल्याचं सिद्ध झालं आहे. गाभाऱ्यात प्रवेशाला बंदी असतानाही प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपल्या पदाचा दुरूपयोग करून छोट्या – मोठ्या लाभांसाठी नियम पायदळी तुडवणाऱ्या या पुजाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन तुळजाभवानी मंदिरात भाविकांप्रमाणेच पुजाऱ्यांसाठीदेखील काही नियम rules घालून देण्यात आले आहेत.
मंदिरात गोंधळ उडू नये, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी आणि सर्वांना न्याय्य पद्धतीनं दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशानं हे नियम आखण्यात आले आहेत. कुठल्याही पुजाऱ्याला मंदिरात काम करण्यापूर्वी या नियमांची कल्पना देण्यात आलेली असते आणि त्या नियमांचं पालन पुजाऱ्यांनी करणं बंधनकारक आहे. मात्र काही पुजाऱ्यांनी या नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे.
या 11 पुजाऱ्यांपैकी प्रत्येकावर कमीत कमी 1 महिना ते जास्तीत जास्त 3 महिन्यांसाठीची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन ही कारवाई आहे. या कारवाईसोबतच प्रत्येक पुजाऱ्याला एक नोटिसही one notice पाठवण्यात आली आहे. आपल्यावर सहा महिने प्रवेशबंदीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिशीतून करण्यात आली आहे.