● शिव-बसव जन्मोत्सव समिती कोरवली या सामाजिक संघटनेने केले अंत्यसंस्कार
विरवडे बु – कोरवलीतील शिव-बसव जन्मोत्सव समिती कोरवली या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन गावातील एका बेवारस मृतदेहावर कामती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील भीमा नदी पात्रातून नवीन उड्डाणपुलाच्या जवळ वाहत आलेल्या अनोळखी बेवारस माणसाच्या मृतदेहावर ( वय अंदाजे २५ ते ३० वर्षे, कपडे पांढरा जीन्स व पांढरा रंगाचा शर्ट ) कामती बुद्रुक येथील स्मशानभूमीत शिवबसव जन्मोत्सव समिती कोरवली या सामाजिक संघटनेच्या वतीने अंत्यसंस्कार केले.
शुक्रवार , २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० च्या सुमारास बेगमपूर येथील एका कामगाराने कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना फोनवरून भीमा नदी पात्रात बेगमपूर येथील उड्डाणपुलाजवळ बेवारस मृतदेह वाहत आल्याची माहिती दिली. Funeral at Kamati Cemetery on unclaimed bodies
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी आपले सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक बापूराव दुधे, पोलीस नाईक सचिन जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल अनुप दळवी, विठ्ठल ओहोळ, इंचगावचे गणेश डोके, बेगमपुरचे भोई समाजातील गणेश माने यांच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी कामती बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
या बेवारस मृतदेहांवर शिवबसव जन्मोत्सव समिती कोरवली या सामाजिक संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य सिध्दाराम म्हमाणे, अमोगसिध्द सुतार, भुताळी म्हमाणे यांनी शनिवारी (दि. २६ ) कामती बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.