● युक्रेनवरील आक्रमणात व्हॅक्यूम बाँबचा वापर
कीव : रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युक्रेनला मदत केली जाणार आहे. भारत युक्रेनला औषधी व इतर जीवनावश्यक वस्तू पाठवणार आहे. दरम्यान भारताने मध्यस्थी करावी आणि रशियाला युद्ध थांबवण्यास सांगावे, अशी विनंती युक्रेनने भारताला केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केला होता.
आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना मानद अध्यक्षपदावरून हटवले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय ज्युडो महासंघाने घेतला आहे. पुतिन यांना अँबेसेडर पदावरून हटवण्यात आले. व्लादिमीर पुतिन ज्युडोमध्ये ब्लॅकबेल्ट आहेत. दरम्यान पुतिन यांची अनेक देशात असलेली संपत्ती गोठवण्यात आली आहे. पुतिन यांच्यावर ट्रॅव्हल बंदीही लावण्यात आली आहे.
कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद रशियाला मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने सर्व जागतिक क्रीडा महासंघाना भविष्यातील रशिया आणि बेलारुस मध्ये होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले आहे. बीजिंग येथील हिवाळी ऑलिंपिक संपल्यावर चार दिवसातच रशियाने ऑलिंपिक चळवळीचा प्रघात मोडला आहे. हे ऑलिंपिक चळवळीच्या विरोधात आहे.
युक्रेनची मानवतावादी गरज लक्षात घेता भारत आता युक्रेनची मदत करणार आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, ‘युक्रेनमधील मानवतावादी गरजा लक्षात घेत भारत सरकारने औषधांसह तत्काळ मदत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत मंगळवारी युक्रेनला पाठवण्यात येईल.’ युक्रेनमधील घडामोडींबद्दल भारत चिंतेत आहे. हिंसाचार तात्काळ संपवण्यात यावा अशी आमची तातडीची मागणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
IOC Executive Board urges all International Federations to relocate or cancel their sports events currently planned in Russia or Belarushttps://t.co/w3zJFhiWpc
— IOC MEDIA (@iocmedia) February 25, 2022
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, ‘युक्रेनच्या सीमेवरील मानवी संकटाचा सामना करण्यासाठी मदतसामग्रीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी मदत मागितल्यानंतर भारताने मदत पुरवठ्याची पहिली खेप पाठविण्याची घोषणा केली आहे.’ War India will help Ukraine; Putin removed by Judo Federation, assets confiscated
India to provide urgent relief supplies, including medicines, to Ukraine
Read @ANI Story | https://t.co/tfAnVHLGxL#UkraineConflict #Ukraine #India pic.twitter.com/XmByL2FrZc
— ANI Digital (@ani_digital) February 28, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
युक्रेनने रशियावर गंभीर आरोप केला आहे. रशियाने युक्रेनवरील आक्रमणात व्हॅक्यूम बाँबचा वापर केला आहे, असे युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्करोव्हाने म्हटले आहे. युक्रेनचे मोठे नुकसान करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे, असाही आरोप युक्रेनने केला आहे. दरम्यान रशियाकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर लवकरच रशिया युक्रेनची राजधानी कीव पूर्णपणे ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
रशियाने युक्रेनविरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचे दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी केला आहे. तसेच यामुळे शक्तीशाली स्फोट घडवण्यासाठी परिसरातील ऑक्सीजन शोषून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा बंदी असल्याचे देखील क्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी म्हणटले आहे. त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट असून दुस-या देशातील तिथं वास्तव करीत असलेली अनेक लोक तिथं अडकली आहेत. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.
व्हॅक्यूम बॉम्बचे एक महत्त्वाची बाब म्हणजे तो ऑक्सिजन शोषून घेतो आणि मोठा स्फोट करतो. अशा स्फोटांमुळे, अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह त्यातून बाहेर पडतात आणि अधिक विनाश घडवून आणतात. त्यामुळे जगात अशा शस्त्रांना अधिक भयानक मानलं जातं. त्यामुळे त्याच्या वापरावरती जगात बंदी आहे. हा बॉम्ब रशियाने तयार केला असून तसेच एखाद्या देशाने त्याच्या विरोधात युद्ध करताना विचार करावा यासाठी तो बॉम्ब त्यांनी तयार केला आहे. हा बॉम्ब तयार करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे, हा बॉम्ब अमेरिकेने 2003 साली तयार करण्यात आला होता.