पुणे : शॉर्ट कपडे घातले म्हणून पुण्यात काही तरुणींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणी पीजी म्हणून राहत होत्या. वाचा सविस्तर काय झाले. मात्र या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली आहे.
पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर असलेल्या तीन तरुणींना चपलेने मारहाण करण्यात आली आहे. परिसरात शॉर्ट घालून फिरत असल्याने त्यांना महिलेने मारहाण केली आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणींच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. Pune – Paying guest young women wore tight clothes, young women were beaten with slippers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालीय. पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात.
त्या वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे. याबाबत घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तक्रारदार महिलेनं सांगितलं की, ‘संबंधित आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद उकरून काढला आहे. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली आहे.