सोलापूर : चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात झाला होता. जवळपास तीन तास ट्राफिक जाम झाले. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला. यात मोठा अनर्थ टळला असला तरी तीन तास कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी (ता.४ ) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
एसटी चालक आणि वाहकांनी एसटीतील प्रवाशांना खाली उतरवण्याची तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जेसीबीच्या मदतीने ऊसाचा ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप झाला.
सोलापूरहून कुर्डूवाडीकडे प्रवासी घेऊन चाललेली बस रोकडोबा मंदिरासमोरुन जात होती. त्याच वेळी ऊसाचा ट्रेलरही चालला होता. अचानकच ट्रॅक्टरच्या ट्रेलरचे चाक निघाले. त्यामुळे ऊसाच्या ट्रेलरचा लोड एसटी बसवर पडला. Sugarcane trailer crashes on moving ST, disaster averted but three hours traffic jam
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात झाला. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला होता. सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टळली. मात्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील रोकडोबा मंदिरासमोर हा अपघात झाला. यानंतर जवळपास तीन तास ट्राफिक जाम झाला होता. माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला. यात मोठा अनर्थ टळला असला तरी तीन तास कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
□ कर्जास कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर – कर्जास कंटाळून एका ७४ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना केमवाडी (ता.तुळजापूर) येथे गुरुवारी (ता. ३) सायंकाळच्या सुमारास घडली. नागनाथ अण्णा जाधव (वय ७४ रा.केमवाडी) असे विषप्राशन केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
सायंकाळच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतात विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांना वडाळा येथे प्राथमिक उपचार करून दशरथ जाधव (मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. कर्जास कंटाळून त्यांनी हा प्रकार केला. अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.