● वीजतोड प्रकरणात महावितरण आणि शेतकर्यांत समन्वय साधणार
सोलापूर : युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरूच आहे. त्यामुळे युक्रेन देशात शिक्षणासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. भारतात परतण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. युक्रेनमध्ये अजुनही 2 विद्यार्थी असून युक्रेन आणि रोमानिया देशाच्या सीमेवर जिल्ह्यातील 20 विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांची खाण्यापिण्याची परवड होत असली तरी ते सर्वजण सुखरूप आहेत. येत्या दोन दिवसात ते मायदेशी परततील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
युक्रेन देशात जिल्ह्यातील 36 विद्यार्थी शिक्षणासाठी होते. त्यापैकी 14 विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. सद्यस्थितीत भारतात परतण्यासाठी 20 विद्यार्थी युक्रेन आणि रोमानिया सीमेवर आहेत. अद्याप दोन विद्यार्थी मात्र युक्रेनमध्येच आहेत. तेही सुखरूपपणे भारतात परततील, असा विश्वास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केला.
कोरोना साथीमुळे जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध पूर्णपणे उठविण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 70 टक्के असायला हवी.
पण सध्या ही संख्या पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. सोलापुरातील बहुतांशी लोक परगावी वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचे लसीकरण झालेले नाही. जे नागरिक गावात आहेत. किती जणांनी लसीकरण करून घेतले आहे. किती जणांचे लसीकरण राहिले आहे. यासंबंधी गावोगावच्या याद्या तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती तयार झाली असून लवकरच त्यानुसार लसीकरणाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्यात येतील. 20 more students from Solapur on the Ukraine-Romania border
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर शहरातील 70 ते 80 हजार लोकांनी अद्यापही लसीकरण करून घेतल्याचे दिसत नाही.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, तहसीलदार अंजली मरोड, दत्तात्रय मोहाळे उपस्थित होते.
□ युक्रेनच्या सैनिकांनी 3 हजार भारतीयांना ओलीस ठेवले होते – पुतिन
वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी एका भाषणात युक्रेनवर गंभीर आरोप केला आहे. युक्रेनच्या सैनिकांनी तब्बल 3 हजार भारतीय नागरिकांना एक दिवस खारकीव्ह येथे ओलीस ठेवले होते. या सर्वांना एका रेल्वे स्टेशनमध्ये कैद करण्यात आले होते, असे पुतिन म्हणाले. तर खारकीव्ह सोडणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांवरही युक्रेनच्या सैनिकांनी गोळीबार केला, यात 2 जण जखमी झाले, असा दावा पुतिन यांनी केला आहे.
□ महावितरण आणि शेतकर्यांत समन्वय साधणार
महावितरणकडून सध्या शेतीपंपाची वीजबिल वसुली जोरात सुरू आहे. थकीत वीजबिलापोटी शेतकर्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठाही खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकर्याने पुन्हा शेतकर्याचा जन्म नको म्हणत व्हीडिओ चित्रीकरण करीत आत्महत्या केली आहे.
या घटनेने सोलापूरसह राज्यभरात खळबड उडाली आहे. जगाच्या पोशिंद्याची ही अवस्था पाहून सर्वजणच चक्रावून गेले आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे महावितरण आणि शेतकरी यांच्यात निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी महावितरणमधील वरिष्ठ अधिकार्यांची सोमवारी बैठक बोलावली आहे.