● दोघे सख्खे चुलत भाऊ, तिसरा त्यांचा मित्र
पुणे : फोटो शूट करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील साठवण तलावातील ही घटना आहे. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते.
आसरार अलीम काझी (वय 21), करीम अब्दुल हादी फरीद काझी( वय 20) अतिक उझजमा फरीद शेख (वय 20 तिघेही राहणार दौंड ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे नावे आहे. यातील दोघे सख्खे चुलत भाऊ असून तिसरा त्यांचा मित्र आहे. मृतांपैकी असरार हा बीए परीक्षा उत्तीर्ण झाला असून पुढील शिक्षण घेत आहे. तर त्याचा चुलत भाऊ करीम आणि त्याचा मित्र अतिक हे दोघेही पुना कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तिघेही फोटो शूट करण्यासाठी या साठवण तलावाजवळ गेले. दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ रविवारी (ता. 6) सायंकाळी ही दुर्घटना घडली. दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता या युवकांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.
असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. 3 youngsters who went for a photo shoot drowned in a lake and died unfortunate
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मित्रांना फोन लावला तर रिंग वाजत होती, मात्र तो उचलत नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख ,रफिक इकबाल सय्यद ,कलिम सलीम सय्यद या सर्वजणांनी त्यांचा शोध दौंड शहर परिसरात घेतला. दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे गाडी मिळून आली.
तलावाच्या नजीक जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले. लोकांना संशय आला की, तिघे मुले तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीसांनी लोकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जावून शोध घेतला असता या तिघांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलीसांनी तलावातील पाण्यात जावून शोध घेतला. त्यावेळी त्या तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.