सोलापूर : मंगळवारी दुपारच्या सुमारास एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील साईस्वरूप हॉटेल शेजारच्या कोरड्या विहिरीत खून केलेल्या अवस्थेत आढळला होता.
वळसंगच्या पोलिसांनी या प्रकरणात अनोळखी इसमाचा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खून झालेल्या तरुणाचे नाव नरेश नागेश चिंता (वय २४ रा. क विभाग, नवीन परकुल कुंभारी) असे आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी राहुल यल्लप्पा पुरुड (वय २२) आणि रिक्षाचालक अनिल दत्तात्रेय राडम (वय २४ रा. नवीन घरकुल, कुंभारी) या दोघांना
अटक केली. त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश अक्कलकोटच्या न्यायालयाने गुरुवारी (ता.31) दिला.
मयत नरेश चिंता हा अविवाहित असून तो हैदराबाद येथे मजुरी करीत होता. त्याच्या परिचयातील राहुल पुरुड बरोबर दुचाकी गहाण ठेवण्याच्या कारणावरून दोघात तक्रार झाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास चिंता आणि पुरुड या दोघांनी कुंभारी येथील रुग्णालय समोरच्या मोकळ्या मैदानात बसून पार्टी केली होती. त्यावेळी दोघात दुचाकीच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा राहुल पुरुड याने खिशातील कात्री काढून त्याच्या डोक्यावर प्रहार करून खून केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने अनिल राडम या आहेत.
The murdered youth at Kumbhari was identified; Both were remanded in custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रिक्षाचालकाला बोलावून घेतले. आणि नरेशचा मृतदेह रिक्षात टाकून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी येथील पडीक विहिरीत टाकून देऊन दोघे पसार झाले. असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. खुनामागचे नेमके कारण काय? याच शोध पोलीस घेत आहेत.
मंगळवारी मृतदेह आढळल्यानंतर वळसंगच्या पोलिसांनी वृत्तपत्र, व्हॉट्सअप आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली होती. तेव्हा मयताच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटून खुनाला वाचा फुटली. तसेच सीसीटीव्हीच्या फुटेज देखील पोलिसांना आरोपी गाठण्यात यश आले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास सहायक निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत .
□ सोरेगाव जवळ रिक्षा उलटून तिघे जखमी