मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला आज अपघात झाला आहे. पनवेलजवळ ही दुर्घटना घडली आहे. यात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मलायकाच्या कारने मनसे पदाधिकाऱ्यांची कारला धडक दिली. मनसे पदाधिकाऱ्यांनी मलायकाला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता.
मलायका अरोराच्या गाडीला पनवेल जवळ अपघात झाला. मलायकाच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली.
Malaika Arora’s car accident, hospitalized psychiatric help
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ मनसैनिक धावले मदतीला
राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मनसेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांनी मलायका अरोराला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मलायकाच्या उपचाराची सोय करून जयराज लांडगे मुंबईकडे रवाना झाले.
जयराज लांडगे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही निघालो असताना पनवेलनजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या तीन गाड्यांना मलायका यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात आपण दाखल केले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल करून मनसेचे नेते लांडगे आणि त्यांचे सहकारी पुढे राज साहेब ठाकरे यांच्या सभेला मार्गस्थ झाले आहेत, अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे.