□ मशिदीवरील भोंगे उतरवले नाही, तर त्यांच्यासमोर हनुमान चालिसा लावा
मुंबई : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुबंईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विनंती केली आहे. ‘तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. यांच्याबाबत पोलिसांना माहिती आहे. या झोपडपट्टीत बऱ्याचशा गोष्टी हाती लागतील,” असे राज ठाकरे म्हणाले.
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेने जाहीर सभा घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठे विधान केले.. “मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. माझा प्रार्थनेला विरोध नाही. पण कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलेले दिसले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीला कौल दिला होता. पण मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने गद्दारी केली असा हल्लाबोल त्यांनी केला. तर जे ठरलं ते आधीच जनतेसमोर का मांडले नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
लोक जातीपातीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभ रहावेत ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना एनसीपीला ही गोष्ट हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासूनच जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर केला.
जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली. महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे आणि फूट पाडत राहणे याची सुरूवात राष्ट्रवादीने केली.
Raid madrassas in slums; Raj Thackeray’s demand to Modi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
निवडणुकींच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो आहोत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असाही सवाल त्यांनी केला.
उत्तर प्रदेश निकाल पाहिल्यानंतर तिथे विकास होतोय हे दिसले. हेच मलाही पाहिजे होते. जेव्हा २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सत्तेत आले तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तीन राज्याचा विकास करा, त्यांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळुदेत अस मी बोललो होतो. आनंदाची गोष्ट आहे की तिथे चांगल होतय. सगळ्यांच ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
□ कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे ?
मुख्यमंत्री पद महाराष्ट्राच जनतेच आहे. ती गोष्ट चार भिंतीत का केली असाही सवाल राज ठाकरे यांनी सभेत केला. मुख्यमंत्री पदासाठी जे अडीच वर्षाच राजकारण केले समोरची व्यक्तीही आता राजकारण करत आहे हे लक्षात घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले. जेव्हा कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे ? ईडीने मलाही नोटीस पाठवली होती. पण मी गेलोच ना नोटीशीला उत्तर द्यायला. मग यशवंत जाधव यांना चार महिने नोटीस येऊनही ईडी संपत्ती अटॅच करते तेव्हा मुख्यमंत्र्यांना इतक चिडायची काय गरज आहे ? असाही सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी पालिकेत जाऊ नये , असाही सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
□ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करा – राज ठाकरे
14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यासंदर्भात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जयंती उत्साहात साजरी करा, असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. आपल्या महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी व्हावी, असेही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.