मुंबई : मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे ठाकरे सरकारचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही, असे ठाकरे म्हणाले होते.
काल राज ठाकरेंनी मदरशात एक धाड टाका असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे यांनी आग लावण्याचं काम करु नये, त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतोय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राचा विकासाची, रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे यांनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांनी मशिदी समोर जायचे. यामुळे दोन्हीकडून आग लागेल. राज ठाकरे राजतीर्थावर घरी निवांत बसून मजा बघतील. आंदोलन करणारे तुरुंगात जातील, सोडायला कोणीही येत नाही. मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे काय नवीन नाही जुनेच गणित आहे.
‘If I find a razor in a madrassa, I will leave politics’
कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ….18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काल त्यांना अचानक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा पुळका आला. कधी आयुष्यात जय भीम म्हणाले आहेत का? कधी घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर गेलेत का? असा सवाल देखील आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. कारण नसताना मुंब्राबद्दल राज ठाकरेंनी जातीयवादी विधान केले आहे. राज ठाकरेंनी माझ्यासोबत कोणत्याही मदरशात यावे त्यांना दाढीचा वस्तरा जरी सापडला तर राजकारण सोडेन असे थेट आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ..18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते असा टोलाच राज ठाकरेंना आव्हाड यांनी लगवाल आहे.
प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच . हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा प्रवास असल्याची खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.