मुंबई : अभिनेता संदीप पाठक याला ‘राख’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट राजेश चव्हाण यांनी दिग्दर्शित केला आहे. कॅनडातील ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2022’ मध्ये संदीप या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. या पुरस्कारासाठी नेदरलँडचा ‘डिर्क मोहर’ आणि अमेरिकेचा ‘डोनॅटो डि’लुका’ हे तगडे कलाकार शर्यतीत होते.
संदीप पाठक याने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला आहे. ‘राख’ या मराठी चित्रपटात संदीपने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा ‘डिर्क मोहर’ आणि अमेरिकेचा ‘डोनॅटो डि’लुका’ हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपने हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवले आहे. हा ‘सायलेंट मुव्ही’ या धाटणीचा हा चित्रपट असून राजेश चव्हाण यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले.
Sandeep Pathak won the award at the International Film Festival
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राजेश चव्हाण यांनी ‘राख’ या सायलेंट मुव्हीचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’च्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात त्याने आपले वेगळे स्थान याआधीच निर्माण केले आहे. दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचे काम नेहमीच संदीपने केले आहे.
अभिनेता संदीप पाठकने अगदी पदार्पणापासून चतुरस्त्र आणि विविधांगी भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करण्यात संदीप नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
संदीपनं ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘रंगा पतंगा’, ‘ईडक’, ‘एक हजाराची नोट’ आदी ५० हून अधिक चित्रपटांच्या जोडीला विविध नाटकांचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि पंचवीसपेक्षाही जास्त टीव्ही शोच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच संदीपचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात त्याची वेगवेगळी रुपे पहायला मिळणार आहेत.
नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक याने मनोरंजन विश्वात कायमच स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या तो करत असलेल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत.
”हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. ‘राख’ च्या संपूर्ण टिमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. ”राख”मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असल्याने यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच आहे.”
– संदीप पाठक