मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्री आकाशातून काहीतरी पडताना लोकांना दिसलं, तसे अनेक व्हिडिओही समोर आले. मात्र नेमकं काय पडलं? याचा ठावठिकाणा कुणालाच लागेना झाला. आकाशातून लाल झोत दिसणारी वस्तू चंद्रपूर जिल्ह्यात कोसळली आहे. आकाशात 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या आगीच्या लोळासह वस्तू खाली पडताना लाखो लोकांनी पाहिले. गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे दिसले.
शनिवारी रात्री महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिला. आकाशातील हे दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला.
आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून आलेत. यातला एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे.
राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर अशा विविध भागातील नागरिकांना संध्याकाळच्या सुमारास आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. ती वस्तू जळताना दिसत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, पडणारी वस्तू नेमकी काय आहे? याची नेमकी माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
What fell from the night sky? Remains found in Chandrapur district
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडले. लाडबोरी गावात कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा अभ्यासकांनी आढावा घेतला आहे.
हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत.
इस्रो अथवा अन्य कुठल्याही अंतराळ संशोधन यंत्रणेनं अशा पद्धतीनं कुठली वस्तू पडली असावी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नसल्याचं लक्षात आणून दिलं आहे. सद्य पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचंही म्हटलं जात आहे. शनिवारी रात्री चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशात अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कांनी हे दिव्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.
राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्री 8 च्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे जाळ आणि धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर अनेकांनी विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती? माहिती मिळू शकली नाही.