Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन

इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Surajya Digital by Surajya Digital
April 4, 2022
in Hot News, Techनिक, महाराष्ट्र
0
धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन
0
SHARES
226
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत शनिवारी रात्री आकाशातून आगीचे गोळे पडताना दिसले. याचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी गावात लोखंडी रिंग पडली. धातूचा गोळा देखील येथे आढळला. हे सर्व चीनच्या रॉकेटचा भाग असल्याचं नासाच्या अंदाजानुसार समोर येत आहे. दरम्यान, इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.

खान्देशातल्या धुळे, जळगावपासून विदर्भात अमरावती, चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आकाशातून आगीचे गोळे पडत होते. पहिल्यांदाच अशा प्रकारची दृश्यं पाहणाऱ्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात ही दृश्यं रेकॉर्ड केली. ही दृश्यं पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसला तर काही ठिकाणी भीतीचं वातावरण होतं. रात्रीची वेळ अचानकपणे आकाशात दिसलेले आगीचे गोळे आणि जोरदार आवाजामुळे लोकांची धावपळही झाली आकाशातून पडणारे आगीचे गोळे म्हणजे काहींना उल्का पडतायत असं वाटलं तर काहींना UFO अर्थात अनआयडेन्टीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स आहेत अशीही शंका आली.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात शनिवारी रात्री आकाशातून रहस्यमयी आगीचे पडताना अनेकांनी पाहिले. पहिल्यांदाच राज्य सरकारने याबद्दल माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील लाडगोरी नावाचे गाव आहे. 10 फूट व्यासाच चक्राकार,  गोल अशी वस्तू पडली आहे. नेमकं ते काय याचा अभ्यास सुरू आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Dangerous! Direct Chinese connection of what fell from the sky in Vidarbha

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दहा फूट व्यासाची चक्राकार वस्तू आढळली आहे. ती वस्तू सॅटेलाईटचा भाग असल्याची शक्यता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे. वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातच ही घटना घडली. माझ्या मतदारसंघात लाडगोरी नावाचे गाव आहे. दहा फूट व्यासाची चक्राकार, गोल वस्तू पडली आहे. याचा अभ्यास सुरू आहे. सॅटेलाईटचा भाग असावा असा अंदाज आहे, पण तो पडत असताना चकाकत होता, सूर्याप्रमाणे आग ओकत असल्यासारखे दिसत होते, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चकाकताना दिसलं अस सगळे सांगतात. एखाद्या घरावर पडलं असतं तर नुकसान झालं असत. मात्र तस झालं नाही कुठलीही जीवितहानी नाही. आता त्याचा अभ्यास केला जात आहे. पाच लोकांची टीम बनविली आहे ते माहिती घेत आहेत. काही ठिकाणी गोळे सुद्धा मिळाले त्याचीही माहिती घेत आहेत. त्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहचू, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा गावात आढळला आहे. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात ज्या ठिकाणी हे आगीचे गोळे पडले त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.बैलगाडीच्या चाकाच्या आकाराएवढ्या लोखंडी पट्ट्या लोकांना सापडल्या. त काहींना धातूची गोलाकार वस्तूही सापडली. लोखंडी गोलाकार वस्तू चीनच्या रॉकेटचं डेब्रीस असल्याचं समोर आलं आहे. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.

Tags: #Dangerous! #Direct #Chinese #connection #fell #sky #Vidarbha#धोकादायक #विदर्भ #आकाश #डायरेक्ट #चायनिज #कनेक्शन
Previous Post

500 कोटींचा घोटाळा, शिवसेनेच्या तक्रारीवर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्याची ED चौकशी

Next Post

हैद्राबादमध्ये रेव्ह पार्टी १४२ जणांना पकडले; अभिनेत्याच्या मुलीला ड्रग्ज पार्टीत अटक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
हैद्राबादमध्ये रेव्ह पार्टी १४२ जणांना पकडले; अभिनेत्याच्या मुलीला ड्रग्ज पार्टीत अटक

हैद्राबादमध्ये रेव्ह पार्टी १४२ जणांना पकडले; अभिनेत्याच्या मुलीला ड्रग्ज पार्टीत अटक

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697