हैदराबाद : हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स येथील एका 5 स्टार हॉटेलच्या पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यादरम्यान पोलिसांनी अनेक व्हीआयपींच्या मुलांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक अभिनेते आणि राजकारण्यांच्या मुलांसह 142 लोकांचा समावेश आहे. अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका, जी मेगास्टार चिरंजीवीची भाची आहे. तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून कोकेन आणि चरस जप्त करण्यात आला आहे.
बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या रेव्ह पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्याच व्यक्तिंचाही समावेश आहे. हैद्राबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४२ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आमली पदार्थही जप्त केले आहेत.
हैदराबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमधे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एक तेलगू अभिनेता, एक गायक आणि इतर सुमारे 142 ग्राहक तसेच हॉटेलचे कर्मचारी ताब्यात घेण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक जण अंमली पदार्थाचे सेवन करतांना पोलिसांना आढळून आले. जप्त करण्यात आलेली पावडर कोकेन असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यातील सर्वांना बंजारा हिल्स पोलिस स्टेशनला आणले गेले. या रेव्ह पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्याच व्यक्तिंचाही समावेश आहे.
Rave party arrests 142 in Hyderabad; Actor’s daughter arrested at drug party
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता नागा बाबू यांची कन्या निहारिका कोनिडेला, बिग बॉस तेलुगू रिऍलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचा समावेश आहे. निहारिका कोनिडेला ही मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आहे. पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोकेन आणि चरस जप्त केलं आहे. गायक आणि बिग बॉस तेलुगू रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचाली ताब्यात घेण्यात आले आहे. राहुलने 12 फेब्रुवारी रोजी हैदराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू केली तेव्हा त्याने थीम सॉंग गायले होते.
त्याशिवाय, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगू देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता आणि इतरांप्रमाणेच चुकीची माहिती पसरवली जात आहे. शहरातील सर्व पब बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी एसएचओ शिव चंद्रा यांना हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्यांच्या जागी टास्क फोर्सचे के.के. नागेश्वर राव यांनी जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यात एका उच्च पोलीस अधिकाऱ्याची मुलगी, टीडीपी खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता, मात्र त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ते म्हणाले की, शहरातील सर्व पब बंद करावेत. हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी बंजारा हिलचे एसएचओ शिव चंद्रा यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.