सोलापूर : ‘ तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे प्रेमपत्रात लिहून पंढरपूरच्या तरुण अभियंत्याने पिंपळवाडी (ता.पैठण) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार सोमवारी (ता.४ ) सकाळी समोर आला. निखिल दत्तात्रय चौंडाळे (२५, मूळगाव – पंढरपूर, ह. मु. आदर्शनगर, सध्या रा. पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवक अभियंत्याचे नाव आहे.
निखिल हा एमआयडीसी पैठण येथील एका कंपनीत नोकरी करीत होता.
सोमवारी सकाळी तो घराच्या बाहेर न पडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना खोलीत काही प्रेमपत्रे मिळून आली.
यावरून प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, एका पत्रात ‘तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
A young engineer from Pandharpur committed suicide in Paithan due to love affair
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ चंदन चोरताना दोघांना अटक
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात पोलिसांनी दोघा चंदन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंटू भीमा गायकवाड, आकाश भैरू भोसले (दोघे रा. मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केगावजवळील विद्यापीठ परिसरात दुचाकीवरून चंदनाची झाडे तोडून दोघेजण निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून पोलिसांनी विद्यापीठाजवळ संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन तपास केला.
या दोघांजवळ 47 किलो चंदनाची लाकडे आढळली. चौकशीत पिंटू भीमा गायकवाड व आकाश भैरू भोसले अशी त्यांची नावे निष्पन्न झाली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. चंदनाची लाकडे व दुचाकी असा सुमारे 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, विद्यापीठात यापूर्वीही चंदनचोरीच्या घटना घडल्या असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.