मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. राऊत यांचे अलिबागमधील 8 भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आले आहे. 1,034 कोटींच्या पत्राचाळ जमीन गैरव्यवहार कनेक्शन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
पत्राचाळ घोळाटा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पैशांचा उपयोग संजय राऊत यांनाही झाला असल्याचे ईडीकडे पुरावे आहे. त्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी भाजपा आमदार निलेश राणे यांनी केली आहे.
२००९ साली कष्टाने घेतलेली जमीन जप्त केली आहे, ती कष्टाने घेतलेली आहे. एक पैसा जरी असा केला असेल तरी ही प्रॉपर्टी भाजपाला दान केली आहे. एक एकरही पूर्ण जागा नसल्याचा राऊतांचा दावा आहे. पत्नीच्या पैशांतून प्रामाणिकपणे घेतली होती. राहते घर जप्त केले आहे. राजकीय सूड, बदला कशा पातळीवर गेल्याचे त्यांनी सांगितले. असे घडत राहिले पाहिजे, यातून लढण्याची प्रेरणा मिळते. अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिलय. तर असत्याचा विजय झाला असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut’s assets confiscated, ED’s big action
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात ५५ लाख रुपये परत केले होते. अशी माहिती किरिट सोमय्या यांनी दिली आहे. दोन महिने संजय राऊत यांची धावपळ, ईडीवर आरोप, किरिट सोमय्या आणि कुटुंबीयांवर आरोप ही त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो, असे किरिट सोमय्या यांनी म्हटले आहे.
या कारवाईनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मनी लाँड्रिंगमधील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल तर, सगळी मालमत्ता भाजपला दान करू, असं राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. ‘असत्यमेव जयते’ असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
“मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार, ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं, मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिलं आहे, माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, दबाव टाकणाऱ्यांना मदत केली नाही तर तुमच्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील, तुम्हाला अटकही करु असं पत्र मी नायडूंना लिहिलं होतं.
मला कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत खचले आहेत असं वाटेल, पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
आम्ही सगळे कुटुंबीय खंबीर आहोत, मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही,, इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही. तुम्ही तुमची कबर खोदायला सुरुवात केली आहे, जे खोटं कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही.
व्यवहार पाहायला हवा, आम्हाला विचारायला हवं, ते न करता तुम्ही ठरवता, तुम्ही कोण ठरवणार? तपास केला का? कायद्याने अमर्याद अधिकार दिले आहेत त्याचा गैरवापर करता, करु द्या… या देशात सैतानाचा, राक्षसांचा अंत झाला..रावण कंस अफजल खान, सगळे मरण पावले, कोणी जिवंत नाही.. मी लढणारा माणूस आहे, प्रॉपर्टी संपत्ती गौण आहे.