पुणे : काही दिवसाआधी औरंगाबादमध्ये तब्बल 27 तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. यावेळेला तब्बल 97 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दिघीच्या गोदामातून या तलवारी पोलिसांच्या खबरदारीमुळे हाती लागल्या. पंजाबातून हा शस्त्रसाठा औरंगाबादला पाठविण्यात येत होता. पोलीस आता येणाऱ्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर अशी शस्त्रास्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. आम्ही 3.7 लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला, हा माल औरंगाबादला पोहोचवला जाणार होता, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयात पोलिसांनी कारवाई केली.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या. आम्ही 3.7 लाख रुपये किमतीच्या 92 तलवारी, 9 खंजीर आणि 2 कुकरी जप्त केल्या, हा शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवला जाणार होता, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
97 swords sent to Aurangabad seized in Pimpri Chinchwad
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात हिंसक प्रकार वाढताना दिसत आहेत. पुणे-पिंपरी चिंचवड शहरात गुंडांनी तलवारी नाचवल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे तलवारी मागवण्याचा किंवा पाठवण्याचा उद्देश काय होता? हे शोधणं पोलिसांसमोरील आव्हान ठरत आहे.
औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी अटक करून आणखी 3 तलवारी जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे.
यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले होते. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.