नांदेड : नांदेडमध्ये आज बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या शहरातील शारदानगर भागात हा गोळीबार झाला आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी कारमधून उतरलेल्या बियाणी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार धक्कादायक घटना घडल्यावर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्येच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
अल्पावधित बांधकाम क्षेत्रात वेगाने झेप घेणारे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या गोळीबार झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घराजवळ अगदी जवळून पाठीमागून त्यांच्यावर पिस्तलमधून चार गोळ्या झाडल्या.
Maharashtra trembled! Builder shot dead in Nanded
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जेवणासाठी म्हणून संजय बियाणी हे घरी आले होते. आणि आपल्या वाहनातून उतरून घरात जात असतानाच हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव झाला असून तेथील काही जणांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती.
संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. बियाणी यांच्या चालकावर उपचार सुरू आहेत. बियाणी यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शहरात तणावग्रस्त वातावरण असल्याने नांदेडमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता.
पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ शोध लावण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
□ दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या; बिल्डर संजय बियाणी कोण होते ?
– नांदेडकरांना स्वस्तात फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
– संजय बियाणी हे सामाजिक उपक्रमात कायम अग्रेसर असायचे.
– विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांना ते सढळ हस्ते मदत करत असत.
– ग्राहकांशी त्यांचं वर्तन अत्यंत नम्रतेचे असायचे. त्यामुळे – बांधकामासारख्या रुक्ष क्षेत्रात राहूनही ते कायम चर्चेत असत.