मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्याच मंत्र्याने प्रश्न निर्माण केल्याचे दिसत आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते. पवार साहेब आज मुख्यमंत्री होणे काळाची गरज आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेत्या व मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे यांना हटवून शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री होणार की का? याबाबत सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे.
राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन हा नवा वाद सुरु झालाय. ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी टोला लगावला आहे. या वादाची ट्विटरवर चर्चा रंगली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महाविकास आघाडीचे जनक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार.
काल शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास श्री शिवाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनिल केदार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्यासह अमरावतीतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्घाटन तसंच महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.
Will the CM change? Congress question marks Uddhav Thackeray’s efficiency
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या कार्यक्रमात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक करत म्हटलं की, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असं ठाकूर यांनी म्हटलं. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळेच राहिले असते. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कुणीही केला असता तर ते शक्य झाले नसते. कोणीही कितीही मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असे वक्तव्य केले.
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षितच होतं. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, यशोमती ठाकून यांनी अमरावतीत विधान केले आहे की शरद पवार मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. यशोमतीताई, मला तर असे वाटते की पवार साहेबांना UPAचे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पूर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव? असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या ट्विट्सची चर्चा जोरात आहे. यावर कार्यकर्ते देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
भाजप आणि मनसे एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तीव्र शब्दांत टीका करत असताना दुसऱ्याबाजूला सरकारमधील मंत्र्यांनीच ‘शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि ते काळाची गरज आहेत’ असं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “यशोमतीताई, मला वाटतं शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे. त्याचा उपयोग संपूर्ण भारतात होईल. देता प्रस्ताव?” असा प्रश्नही त्यांनी यशोमती ठाकूर यांना विचारला.
#मुख्यमंत्री आज @AdvYashomatiINC यांनी अमरावतीत विधान केले आहे की @PawarSpeaks मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते.
मा.यशोमतीताई,मला तर असे वाटते की मा.पवार साहेबांना UPA चे
अध्यक्ष करावे!त्यामुळे तर पुर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव ? @PTI_News @OfficeofUT @ANI— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) April 10, 2022
काँग्रेसच्या काही आमदारांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी ही भेट हवी होती, असं काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितलं होतं. महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला.