मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता मद्यविक्री दुकाने आणि बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, महान व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. तसेच सध्या असलेली नावे बदलण्याकरता 30 जूनपर्यंत मद्यविक्री आस्थापने व बार यांना मुदत देण्यात आली. गृहविभागाने 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील 105 गडकिल्ल्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे दिल्याचे आढळून येते. मात्र राज्यात यापुढे मद्यविक्री दुकाने आणि बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, महनीय व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेली नावे बदलण्याकरता ३० जूनपर्यंत मद्यविक्री आस्थापने व बार यांना मुदत देण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या एका आदेशात म्हटलंय, राज्यातील गडकिल्ल्यांविषयी तसेच राष्ट्रपुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. त्यामुळे देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गडकिल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास देवदेवता, राष्ट्रपुरुष व गडकिल्ल्यांची विटंबना होते. याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात.
Big decision – liquor stores, bars banned from naming greats after deities
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यामुळे सामाजिक वातावरणही दूषित होते. त्यामुळे राज्यातील मद्य विक्री दुकाने व बार यांना कोणकोणत्या राष्ट्रपुरुषांची व गडकिल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असंही या आदेशात सांगितलं आहे. यासंदर्भात गृह विभागाने एक यादी जाहीर केली आहे. त्यात 56 राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा आणि राज्यातील 105 गडकिल्ल्यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या मद्यविक्री दुकाने व बार यांना देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची व गडकिल्ल्यांची नावे असतील तर ती 30 जूनपर्यंत बदलावीत, अशा सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.
□□□□□□□□□□□□□□□□□□□
श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
#शुभेच्छा #surajyadigital #सुराज्यडिजिटल
जगभरातील समस्त हिंदूंचे आराध्यदैवत, हिंदू अस्मितेचे प्रतिक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
#RamNavami #रामनवमी #ramnavami2022
सत्यवचन, संस्कृती, परंपरा व त्याग याचे जतन करणारे एक आदर्श शासक प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणी वंदन…!
□ शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सवाचा उत्साह
#surajyadigital #shegaon #शेगाव #GajananMaharaj #RamNavami2022 #सुराज्यडिजिटल #रामनवमी #ramnavami2022
शेगावात संत गजानन महाराज मंदिरात राम जन्मोत्सव उत्साह आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात. कोरोना निर्बंध मुक्तीनंतर शेगावात पहिलाच उत्सव आहे. राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. आजचा राम जन्मोत्सव सोहळा संपल्यानंतर उद्यापासून तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे.