कोल्हापूर : 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षिस म्हणून दिली जाणारी रक्कमच मिळालेली नाहीये. अवघ्या 19 वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. पण त्याला बक्षीसच न दिल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले. साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जातय.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2022 चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून 5 लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे. कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी आले असताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच कोल्हापूरला आखाड्याची आणि पैलवानाची परंपरा आहे ती जपली गेली पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ऋतुराज पाटील याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली असली तरीदेखील स्पर्धेच्या आयोजकांवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्या नंतर आयोजकांनी आपल्याला फक्त मानाची गदाच दिल्याचे त्याने म्हटले आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम दिली नसल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेला एका नव्या वादाची किनार लाभण्याची चिन्हे आहेत.
कुस्ती पंढरीचा तब्बल 22 वर्षांचा दुष्काळ संपवत पै. पृथ्वीराज पाटील याने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा कोल्हापुरात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पृथ्वीराजने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ‘लोकराजा’ला मानाचा मुजरा केला.
राज्याचे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, खासदार उदयनराजे भाेसले यांचे समर्थक माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी पृथ्वीराज पाटील यांस लाखाे रुपयांची बक्षीसं जाहीर केली आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील या पैलवानाने इतिहास रचला. तब्बल २१ वर्षानंतर त्याने कोल्हापूरला हा मानाचा पुरस्कार मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी राज्यभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Maharashtra Kesari Prithviraj Patil did not get any prize; But BJP will get five lakh bullets and Talim Sangh will get bullets
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पृथ्वीराजचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज पाटीलच्या कामगिरीसाठी भारतीय जनता पार्टीकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. भाजपा मार्फत त्याचा जाहीर सत्कार करण्याची घोषणाही पक्षामार्फत फडणवीस यांनी केली आहे. तर पृथ्वीराजला पाच लाखांचा विशेष पुरस्कार देणार असल्याचेही भाजपाने घोषित केले आहे. ऋतुराज पाटीलच्या पुढील सरावासाठी ही रक्कम त्याला उपयोगी पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १० एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघाकडून बुलेट ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे. ही बुलेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान केली जाणार आहे, अशी माहिती तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनिल काटकर यांनी दिली आहे.
¤ 1961 पासूनचे महाराष्ट्र केसरी विजेते
दिनकर दहयारी (औरंगाबाद, 1961), भगवान मोरे (धुळे, 1962), गणपत खेडकर (अमरावती, 1964 व नाशिक, 1965), दीनानाथ सिंह (मुंबई, 1966), चंबा मुतनाळ (खामगाव, 1967 व नागपूर, 1968), हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), दादू चौगुले (पुणे, 1970 व अलिबाग, 1971), लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972 व अकोला, 1973), युवराज पाटील (ठाणे, 1974), रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), हिरामण बनकर (अकलूज, 1976), आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), इस्माईल शेख (खोपोली, 1980), बापू लोखंडे (नागपूर, 1981), संभाजी पाटील (बीड 1982), सरदार खुशहाल (पुणे, 1983), नामदेव मोळे (सांगली, 1984), विष्णूजी जोशीलकर (पिंपरी-चिंचवड, 1985), गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), तानाजी बनकर (नागपूर, 1987), रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), उदयराज जाधव (पुणे, 1993), संजय पाटील (अकोला, 1994-95), शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), गोरखनाथ सरक (नागपूर, 1997-98), धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), राहुल काळभोर (नांदेड, 2001), मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), चंद्रहास निमगिरे (वाशी, 2002-03), सईद चाऊस (इंदापूर, 2004-05), अमोल बुचडे (बारामती, 2005-06), चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007 व सांगली, 2008), विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), समाधान घोडके (रोहा, 2010), नरसिंग यादव (अकलूज, 2011, गोंदिया, 2012, भोसरी, 2013), विजय चौधरी (2014, 2015, 2016), अभिजित कटके (2017), बाला रफीक शेख (2018), हर्षल सदगीर (2020).