इस्लामाबाद : पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी शाहबाज शरीफ यांची संसदेतील नेता म्हणून निवड केली आहे. ते सर्व विरोधी पक्षांचे नेते असतील. त्याचबरोबर बिलावल भुट्टो हे परराष्ट्र मंत्री होऊ शकतात. दरम्यान, नवाझ शरीफही देशात परत येऊ शकतात, अशी बातमी आहे.
काल मध्यरात्री इमरान खान यांना आपल्या पंतप्रधान पदाची खूर्ची सोडावी लागली. ते संसदेत बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. आता पाकिस्तान मुस्लिम लीगचे [नवाज] शाहबाज शरीफ हे पंतप्रधान होणार आहेत. 2018 पासून ते विरोधीपक्ष नेते होते, याआधी शाहबाज तीनवेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीही होते. आत्तापर्यंत पंजाब प्रांताचे दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री अशीही त्यांची ओळख आहे. सध्या ते शरीफ PML-N चे अध्यक्ष आहेत.
पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पडले आहे. त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर त्यांच्या पक्षातील खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे मध्यरात्री 12 वाजता या अविश्वास ठरावासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.
इम्रान खान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शरीफ यांनी ट्विटद्वारे मीडिया, वकिलांचे आभार मानले होते. इम्रानविरोधातील अविश्वास ठराव रविवारी मंजूर करण्यात आला. १७४ खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या देश सोडण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने ना हरकत प्रमाणपत्राशिवाय देश सोडू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळ सुरक्षा दलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान खान देश सोडून पळून गेल्याची चर्चा सुरु आहे.
Shahbaz Sharif will be the next prime minister, Imran Khan has fled the country Pakistan
One person who is not in his senses anymore cannot be allowed to wreak havoc & bring the entire country down. This is not a joke. He should not be treated as PM or ex PM, he must be treated as a PSYCHOPATH who just to save his own skin is holding the entire country hostage. Shame
— Maryam Nawaz Sharif (@MaryamNSharif) April 9, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पाकिस्तानातल्या विरोधी पक्ष नेत्या मरियम नवाझ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला.
आज रविवारी विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे शाहबाज शरीफ यांचे नाव दिले. शाहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. रविवारी त्यांनी ट्विट केले की, मीडिया, सिव्हिल सोसायटी, वकील, नवाज शरीफ, आसिफ झरदारी, मौलाना फजल-उर-रहमान, बिलावल भुट्टो, खालिद मकबूल, खालिद मगसी, मोसीन दावर, अली वजीर, अमीर हैदर होता आणि सर्व पक्ष, संविधानासाठी उभे राहिल्याबद्दल आमचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानचे पुढील परराष्ट्र मंत्री बनवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करताना शरीफ यांचे नाव विशेष चर्चेत होते.
□ इम्रान खान पहिलेच पंतप्रधान
इम्रान खान यांना सत्तेवरून बेदखल करण्याची स्क्रिप्ट या वर्षीच्या जानेवारीपासूनच लिहिली गेली होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जानेवारीमध्ये, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ यांनी इम्रानला हटवण्यासाठी पाकिस्तानी लष्करासोबत करार केला होता.
अविश्वास प्रस्ताव टाळण्याच्या अनेक प्रयत्नांनंतर पाकिस्तानच्या नॅशनल संसदेमध्ये मध्यरात्री मतदान झाले. यावेळी ३४२ सदस्यांच्या सभागृहात १७४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. पाकिस्तानमध्ये कार्यकाळ पूर्ण न करता पंतप्रधानपद गमावण्याची घटना नवीन नसली तरी अविश्वास प्रस्तावाद्वारे पायउतार होणारे इम्रान पहिलेच पंतप्रधान आहेत.