वेळापूर : जबरी चोरीचा फिर्यादीच १ लाख ८६ हजार रुपयांचा चोरटा निघाल्याची घटना सोलापुरात घडली. यात वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बारा तासात या चोराला पकडण्यात यश आले आहे.
वेळापूर पोलीस स्टेशन येथे रामचंद्र हांबिराव साबळे (रा. लिंबोडी ता. इंदापूर जि. पुणे) हे राजेश तुकाराम फडे (रा. अकलूज) यांच्या हिंदुस्तान युनिलीवर लिमीटेड एजन्सी येथे सुमारे पंचवीस वर्षापासून सेल्समन म्हणून काम करत होते. ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी माळेवाडी, खंडाळी गावातील किराणा दुकानदार यांच्याकडून मालाचे जमा झालेले एकूण १ लाख ८६ हजार ४३६ रुपये रक्कम गोळा करून खंडाळी ते अकलूज असे मोटरसायकल वरून जात होते.
खंडाळी (ता. माळशिरस) येथील खडी क्रेशर समोर मोटारसायकलची पुढील चाकाची हवा कमी झाल्यामुळे मोटरसायकल थांबवून हवा चेक करत असताना पाठीमागून स्प्लेंडर मोटरसायकल वरून अनोळखी तीन इसमांनी येऊन त्यापैकी दोन इसमांनी एक इसमांनी धरून खाली पाडून दुसऱ्या अनोळखी इसमाने गळ्यातील पैसे असलेली खाकी रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली आहे, अशी हकिकत हकीगत रामचंद्र साबळे यांनी पोलिसात सांगितली.
The thief will file a complaint of forcible theft; Velapur police arrested the thief in twelve hours
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावरून वेळापूर पोलीस स्टेशनला ११ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ११४/२०२२ कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मात्र फिर्यादी सांगत असलेली हकिकतमध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता जबरी चोरी घडलेली नसून त्याचा बनाव करून सदरचे पैसे रामचंद्र साबळे यांनी स्वतः लपवून ठेवलेले होते, असे सांगितल्यावर सदर आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम १ लाख ८६ हजार ४३६ रुपये जप्त केली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सुनील जाधव हे करीत आहेत. ही कारवाई अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस नाईक यशवंत आनंदपुरे, अमोल वाघमोडे, संदीप पाटील यांनी केली.
□ अवैध धंद्यावर विशेष भरारी पथकाचा छापा ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त