मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याबाबत संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्ल्यामागे नागपूरचा व्यक्ती मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार हल्ल्याच्या 1 तास आधी वकिल सदावर्तेना संदीप गोडबोलेचा फोन आला होता. तो एसटीचा बडतर्फ कर्मचारी आहे. त्याआधारे पोलिसांनी संशयित म्हणून संदीप गोडबोलेला अटक केली.
संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी नागपूरमधून अटक केली होती. गोडबोले आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आज कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी आरोपीकडून त्याचा मोबाइल फोन ताब्यात घ्यायचा असल्याचे सरकारी वकीलांनी म्हटले. आरोपी अॅड. सदावर्ते यांच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप कॉल आणि मेसेज होते. हे फोन नागपूरला करण्यात आले. याचा तपास करताना आरोपीचे नाव समोर आले होते, असे सरकारी वकिलांनी म्हटले.
सरकारी वकिलांनी म्हटले की, मुख्य आरोपी आणि या आरोपीचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आरोपी संदीप गोडबोले हा एसटी कर्मचारी नसून सदावर्ते यांच्यासोबत असणारी व्यक्ती आहे. त्याने एलएलएमचे शिक्षण घेतले असून वकिलीची सनद घेतली नसल्याचेही समोर आले. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी संदीप गोडबोले याने कोर्टाला सांगितले की, आझाद मैदानात जल्लोष पाहून मी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आमदार निवासला माघारी गेलो. रात्री तेथे थांबून दुसऱ्या दिवशी मैदानात आलो. सदावर्ते यांनी मोबाइल फोन कॉल उचलला नाही. म्हणून व्हॉट्स अॅप कॉल केला असल्याचे कोर्टाला सांगितले. आरोपी संदीप गोडबोलेकडे बाजू मांडण्यासाठी वकील नव्हता. त्यावर माझ्याकडे वकील करण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा आरोपी गोडबोलेने मांडला. न्यायलयाने वकील हवा का अशी विचारणा केली होती.
Nagpur’s mastermind Sandeep Godbole sentenced to police custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोर्ट – संदिप गोडबोले आपले कोणी वकील आहेत का? संदीप – नाही, माझ्याकडे वकील करायला पैसे नाहीत कोर्ट – काही सांगायचे आहे का? संदीप – त्यादिवशी ७ तारखेला या बैठकीला मी नव्हतो.
8 एप्रिल रोजी झालेल्या राड्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना कोर्टात हजर केलं असता आधी दोन आणि पुन्हा दोन अशी चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काल सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होता.
विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी पोलिसांच्या बाजूने युक्तीवाद सुरु केला. “सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेने जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून जवळपास 2 कोटी रुपये गोळा केले गेले.
नागपूरवरुन फोन केला गेला ती व्यक्ती हीच, संदीप गोडबोले. संदीप हा व्हॉट्सअॅप कॉलवरुन सदावर्ते यांच्या संपर्कात होता. संदीपनेच पत्रकार पाठवा असा मॅसेज सदावर्तेंना केला होता. संदीप हाच हल्ल्याचं नेतृत्व करत होता”, असा दावा सरकारी वकील प्रदिप घरत यांनी केला.
या दरम्यान आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांचे संभाषण कोर्टात सादर केले गेले. संदीपचा मोबाईल तपासायचा आहे. संदीप आणि अभिषेक पाटील या दोघांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यानंतर कोर्टाने संदीपला आपले वकील आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर संदीपने आपल्याकडे वकिलासाठी पैसे नाहीत, असे उत्तर दिलं. कोर्टाने संदीपला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.