जालना : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रात्री अपघात झाला आहे. हा अपघात जालना जिल्ह्याच्या परतूर – सेलू मार्गावर घडला. लाकडाने भरलेला ट्रॅक्टर आणि इंदुरीकर महाराजांच्या स्कॉर्पिओची धडक झाली. सुदैवाने या अपघातातून इंदुरीकर महाराज सुखरुप आहेत. त्यांच्या गाडीचा चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे. काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नाही.
माहितीनुसार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना काल बुधवारी (ता. 13) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.
Maharaj saved Indorikar’s car from an accident
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोहोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.