मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमी हटक्या कवितेमुळे आणि विधानामुळे चर्चेत येत असतात. आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या विरोधातील भूमिकेबद्दल मत व्यक्त केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही कट्टर होती, पण त्यांनी कधीही भोंगे उतरवा असे म्हटले नव्हते. जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा असे म्हणत आठवले यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी इतरांचे भोंगे उतराण्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, त्यांना जिथे लावायचे आहेत तिथे त्यांनी लावावे. काही नेते पिढ्यानंपिढया पासून भोंग्यांवर बोलत आहेत. बाळासाहेब यांची भूमिका कट्टर होती पण भोंगे उतरवा असं ते कधी म्हटले नाही. जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही भोंगा अशी कविता करत मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या प्रस्तावला आमचा विरोध आहे. भाजपमध्ये मनसेला येण्याची गरज नाही. त्यांच्या सभेत जितकी गर्दी होते तीच गर्दी निवडणुकीत कुठे जाते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Ramdas Athavale criticizes Raj Thackeray and Sharad Pawar follows
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मशिदीवरील भोंगे विरोधात राज ठाकरे यांची भूमिका निषेधार्ध आहे. भोंगे काढण्याचा आग्रह ही धर्मनिरपेक्षतेविरोधात भूमिका आहे. सर्वांना आपल्या धर्मानुसार आचरणाचा हक्क आहे. मंदिरांवर भोंगे लावून हनुमान चाळीसा पठण करा. मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत. त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे जातीयवादी नसून ते धर्मनिरपेक्ष असल्याचेही आठवले यांनी म्हटले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर राज्यात जातीयवाद वाढू लागल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे श्रेय शरद पवार यांना असल्याचे आठवले यांनी म्हटले. शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर विद्यापीठ नामांतराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर जातीय दंगल उसळल्याने नामांतर लांबणीवर पडले होते. या दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले आणि मतैक्य निर्माण केले. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले असल्याचे आठवले यांनी सांगितले.