मुंबई : अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे काल गुरुवारी लग्न झाले. या लग्नाविषयी आलियाचा भाऊ राहुल भटने माहिती दिली आहे. तसेच रणबीर आणि आलियाने 7 फेरे घेतले नाहीत, तर फक्त 4 फेरे घेण्यात आले, असे राहुलने सांगितले. लग्नासाठी एक खास पंडितजी आले होते, त्यांनी 4 फेऱ्यांचे महत्त्व समजून सांगितले, अशीही माहिती राहुलने दिली.
दोघे काल विवाहबंधान अडकले. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थित रणबीर-आलियाने लग्नगाठ बांधली. लग्नाचे विधी हे सात फेरे घेऊन पूर्ण होतात. मात्र, रणबीर आणि आलियाने त्यांच्या लग्नात सात नाही तर फक्त चारच फेरे घेतले. आलियाचा भाऊ राहुल भट याने याबाबतचा खुलासा केला असून त्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
काही ठिकाणी लग्नात सात ऐवजी चार फेरे घेण्याची पद्धत आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या जीवनातील चार ध्येयांचा अर्थ समजावून सांगत चार फेरे घेण्याची पद्धत आहे. पंजाबी रितीनुसार लग्नात चार फेरे घेण्याची पद्धत आहे. आलिया व रणबीरनेही चार फेरे घेत पंजाबी पद्धतीने लग्न केले.
दरम्यान, मला फेऱ्यांचे महत्त्व माहिती नसल्याचं राहुल भट्टने स्पष्ट केलं. कपूर कुटुंबीयांच्या घरात चार वर्षांपासून पूजा करणाऱ्या पंडितजींनी या फेऱ्यांचे महत्त्व समजून सांगितले. त्यामुळे मला हे सर्व मला खूप इंटरेस्टिंग वाटल्याचंही राहुल भट याने सांगितलं.
आलियाचा भाऊ राहुल आलिया आणि रणबीरच्या लग्नतील फेऱ्यांबाबत म्हणाला की, “हे खूप इंट्रेस्टिंग होतं, खरंतर त्यांच्या लग्नात आम्ही सात फेरे पाहिलेच नाहीत. आम्ही त्यांच्या लग्नात खास पंडित बोलावले होते. जे कपूर घराण्याचे खास पंडित आहेत. ते आम्हाला प्रत्येक फेऱ्याचे महत्त्व सांगत होते. तेव्हा ते म्हणाले की, एक फेरा धर्मासाठी आणि एक फेरा मुलांसाठी,…आणि बाकी दोन फेऱ्यांबाबत मी काहीच बोलू शकत नाही.
कारण ते थोडं सिक्रेट आहे. आमचे कुटुंब अशा अनेक गोष्टींचं पालन करते, ज्या वंशपरंपरागत चालत आलेल्या आहेत. आणि या सगळ्याचे आम्हाला नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे कपूरांकडे सात फेऱ्यांऐवजी चारचं फेरे घेतले जातात. हे देखील आमच्यासाठी कुतूहलाचा, उत्सुकतेचा भाग ठरले. मी त्या चारही फेऱ्यांक्षणी तिकडे होतो”.
गुरुवारी लग्नानंतर आलिया – रणबीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आपण लग्नबंधनात अडकल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. आलिया-रणबीरच्या लग्नात सगळ्यात चर्चेचा विषय ठरला तो, त्या दोघांचा ही लूक. या दोघांनीही आपल्या लग्नासाठी खूप वेगळ्या रंगाचे पोशाख निवडले होते. आलियाने ऑफ व्हाइट रंगाचा लेहेंगा घातला होता आणि रणबीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. या कपड्यांमध्ये दोघेही खूप सूंदर दिसत होते.
Alia Anna Ranbir’s marriage, but took only 4 rounds, Alia became the 11th daughter-in-law of Kapoor family
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अलियाने सांगितले का केले घरीच लग्न
लग्नानंतर आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो आणि एक मेसेजही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिनं घरी लग्न का केलं याचं कारण खूप छान समजावून सांगितले आहे. ती म्हणाली की ,”आमच्या आवडीच्या ठिकाणी, बालकनीजवळ जिथे गेली पाच वर्ष आम्ही एकत्र आमचे प्रेमाचे नाते अनुभवले तिथे आमच्या कुटुंबाच्या, मित्रपरिवाराच्या साक्षीणे आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचे वचन एकमेकांना देणे याशिवाय वेगळा आनंद काय असू शकतो..आम्ही कायमचे एकमेकांचे झालो, व्हि आर मॅरिड!” तिने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की,”अनेक आठवणी मागे राहिल्यात,आता आम्हाला एकत्र आयुष्य जगत अनेक गोड आठवणी जोडत पुढचं आयुष्य आनंदात जगायचे आहे. जिथे खूप आनंद, सुख ,शांतता असेल सोबतच खूप सारी धम्माल असेल”.
□ आलिया कपूर घराण्याची ११ वी सून
घराण्यातील जवळ-जवळ ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे. इतकचं नव्हे तर आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचे नाव सुद्धा कपूर घराण्याशी जोडले गेले आहे.
१९२८ च्या काळापासून आतापर्यंत कपूर घराण्याचे हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंध जोडलेले आहेत. जवळ-जवळ कपूर घराण्याच्या ५ पिढ्यांनी आतापर्यंत चित्रपट सृष्टी गाजवली आहे. कपूर घराण्यातील पृथ्वीराज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले. आता आलिया आणि रणवीरच्या लग्नानंतर आलियाचे नाव सुद्धा कपूर कुटुंबाशी जोडले गेले आहे.
बॉलिवूड अभिनेता पृथ्वीराज कपूर यांनी रामसरानी मेहरासोबत लग्न केले होते. पृथ्वीराज कपूर यांना राज कपूर , शम्मी कपूर , शशी कपूर आणि उर्मिला कपूर ही चार मुले होती.
बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांचे लग्न कृष्णा मल्होत्रा यांच्यासोबत झाले. त्यांना ऋषी कपूर , रणधीर कपूर , राजीव कपूर ही ३ मुले आणि रतु नंदा आणि रीमा जैन या २ मुली होत्या. १९५५ मध्ये बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबत लग्न केले, आदित्य राज कपूर आणि कांचन ही त्यांची २ मुले आहेत. गीता बाली यांच्या मृत्यूनंतर शम्मी यांनी नीला देवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.
बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांनी इंग्लिश अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत लग्न केले. करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही त्यांची ३ मुले आहेत. बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबिता यांच्याशी लग्न केले, त्यांना करिश्मा कपूर आणि करीना कपूर या त्यांच्या २ मुली आहेत. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांच्याशी लग्न केले, त्यांना रणबीर आणि रिद्धिमा ही २ मुले आहेत.
बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांनी आरती सभरवालसोबत लग्न केले. परंतु त्यांचा काही काळाने घटस्फोट झाला. शम्मी कपूर यांचा मुलगा आदित्य राज कपूर यांनी प्रीती कपूर यांच्यासोबत लग्न केले.
शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांनी सिप्पी यांच्यासोबत लग्न केले. शशी कपूर यांचा करण कपूर यांनी लोर्ना कपूर यांच्यासोबत लग्न केले आहे. तसेच रणबीर कपूरने १४ एप्रिल रोजी आलिया भट्ट हिच्या लग्न केले, आता आलिया कपूर घराण्याची ११ वी सून झाली आहे.