मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. त्यातच याचा फटका राज ठाकरेंच्या पक्षाला बसत असताना दिसत आहे. मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. तसेच मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागातील 35 मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेवरून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. तेव्हापासून राज्यातील मनसेला गळती लागली आहे. दरम्यान आज मराठवाड्यातील 35 नाराज मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेला रामराम ठोकला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा द्यायला सुरूवात केली. तर मनसे नेते वसंत मोरे यांनीही राज ठाकरे यांच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र वसंत मोरे यांची नाराजी दुर करणाऱ्या मनसेतील 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
Big blow to MNS, 35 office bearers resigned
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पुण्यातील मनसे शाखा अध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजीनामा सत्र हे राज्यभर सुरु झाले असल्याचे चित्र आहे. मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत राज्यातील 35 जिल्ह्यांच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. तर राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतरही मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असल्याने मनसेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मनसेच्या उत्तरसभेत 3 मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उगारले. त्यामध्ये पुणे शहरातून 2 तर राज्य सचिव इरफान शेख आणि त्यापाठोपाठ आता मनसेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. तर हा मनसेच्या उत्तरसभेचा उतारा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
□ महाराष्ट्रातील भोंगा वादाचे पडसाद आता उत्तरप्रदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलला. भोंगे काढले नाहीतर हनुमान चालीसा लावणार, असे विधान त्यांनी केले आणि राजकारण तापले. या चालीसा पठणाचे पडसाद महाराष्ट्रातून इतर राज्यातही उमटत आहेत. उत्तर प्रदेशातल्या कासगंज आणि अलिगडमध्ये मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात करण्यात आली.