मुंबई : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा पठण केले. दरम्यान तेव्हा ते अंगावर भगवा शेला घालून होते, त्यावर राष्ट्रवादीचे रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ अंगावर भगवी शाल पांघरून बाळासाहेब ठाकरे होता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता एकदाच होतो, तो पुन्हा घडत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट भाजपची आहे तसेच अंगावर शाल टाकली म्हणजे कुणी बाळासाहेब होत नाही असा पलटवार ही त्यांनी केलाय. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेते विरुद्ध मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिळाव्यात आणि त्यानंतर उत्तर सभेतही राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्याच्या या आरोपाला खुद्द शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
No one becomes Balasaheb by wearing saffron shawl on his body Rohit Pawar Raj Thackeray
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे हे बाळासाहेबांची कॉपी करत आहे. मात्र अंगावर शाल टाकली म्हणजे बाळासाहेब होत नाही. आधी मला राज ठाकरे यांचे भाषण आवडायचं. मात्र आता ते भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचतात. आता ते विकासाच्या मुद्द्यावर मात्र बोलत नाही. राज ठाकरे हे चांगले अभिनेते असून ते चांगला अभिनय करत असल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली.
जालन्यात रोहित पवारांनी वक्तव्य केलं, काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केलं जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरले जात आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्यवाद, समता, सामाजिक न्याय, मूलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. तो जपणं हीच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे. पण एकीकडं संविधानाच्या मूळ तत्वांना चिरडायचं आणि दुसरीकडं खोटा कळवळा दाखवायचा हा तुमचा इतिहास आहे, असे रोहित पवार यांनी पोस्ट करून ती देवेंद्र फडणवीस यांना टॅग देखील केले आहे.
■ मराठवाड्यातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर
मराठवाड्यात नळ योजनांच्या पुनर्जोडणीची कामे संथगतीने सुरू असून 5794 पैकी केवळ 364 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. नळ योजनांच्या पुनर्जोडणीची कामे कधी होणार, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मराठवाड्यात 5794 गावांमधून जुन्या नळ योजना अस्तित्वात आहेत. मात्र, या योजनांच्या पुनर्जोडणीमुळे त्याचा उपयोग गावाला पाणीपुरवठ्यासाठी होत नाही.