□ न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही : गृहमंत्री
मुंबई : एकीकडे मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी राज ठाकरेंनी 3 में पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वेगळेच संकेत दिले आहे. न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असे कुठेही लिहिलेले नाही. तर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लावू नये असे लिहिलेले आहे. दरम्यान, यामुळे लाऊडस्पीकरवरुन मनसे व ठाकरे सरकार असा सामना पाहायला मिळू शकतो.
‘न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही. रात्री 10 ते सकाळी 6 लावू नये असं लिहिलं आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. मुंबईत ते बोलत होते. ज्यांना प्रार्थना करायची आहे ती घरात करावी, मंदिरात करावी, उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असंही ते म्हणाले. भाजपने केवळ धार्मिक भावना पुढे करून प्रचार केला परंतु त्यांना लोकांनी नाकारलं आहे, असंही ते म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र ज्या मशिदींनी, मदिरांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली आहे आणि नियमांचे पालन करत आहेत ते भोंगे उतरवण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मांडली आहे.
न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा, असे कुठेही म्हटले नाही. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपणाला न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेतली आहे आणि कायद्याचे पालन जे करत आहेत तेथील लाऊडस्पीकर काढायचा प्रश्नच येत नसल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून तेथे हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे.
Will not remove the horns on the mosque? – Thackeray government’s signal
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाआरती आणि हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या वादंगावर गृहमंत्री म्हणाले की, ज्यांना हनुमान चालीसा, महाआरती वगैरे म्हणायचे आहे किंवा ज्याला जे जे करायचे आहे ते त्यांनी आपल्या घरात, तीर्थस्थानावर, आपापल्या मंदिर, मस्जिद आणि प्रार्थनास्थळी करावे. पण सध्या या गोष्टींचे विनाकारण राजकीय भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही वळसे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र पोलीस मुस्लीम संघटनांसोबत बोलणे करत आहेत. त्यांना भोंगे आणि आवाजासंदर्भातील जे नियम आहेत, त्यांची सविस्तर माहिती दिली जात आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.
माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीतल विजयावरही भाष्य केले. कोल्हापूरचा विजय आम्हाला अपेक्षित होता आणखी मोठा विजय होणे अपेक्षित होतं, असे ते म्हणाले. भाजपने केवळ धार्मिक भावना पूढे करून प्रचार केला परंतु त्याना लोकांनी नाकारलं आहे, असे वळसेही वळसे पाटील म्हणाले.
तसेच कोठडीत असलेले सदावर्ते गुणरत्ने यांच्या पत्नी जयश्री पाटील कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. तसेच शरद पवार यांच्या घरी आलेल्या एकटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपान करून आलेले एसटी कर्मचारी देखील होते. जयश्री पाटील कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. तसेच शरद पवार यांच्या घरी आलेल्या एकटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपान करून आलेले एसटी कर्मचारी देखील होते, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.