मुंबई : विमल पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली होती. या माफीनाम्याला बऱ्याच सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे त्यामध्ये अभिनेते मिलिंद सोमण यांचं सुद्धा नाव आहे. “अक्षय कुमार, कारण काहीही असो पण तू योग्य निर्णय घेतला आहेस,” असे मिलिंद सोमण म्हणाले. फक्त मिलिंद नाही तर इतर सेलिब्रिटींनीही अक्षयचे कौतुक केले आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी विमल पान मसालाच्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यासोबत झळकला होता. त्यावरून अक्षय कुमारला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
यासंबंधी अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. नुकतंच या सगळ्या प्रकारावरून मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने अक्षयला पाठिंबा दिला आहे.
मिलिंद सोमणने अक्षय कुमारसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं, ‘अक्षय कुमार, तुझी निवड योग्यच आहे, मग त्याचं कारण काहीही असो.’ मिलिंद सोमणचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याशिवाय इतरही काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारला पाठिंबा दिला आहे.
Apology from Akshay Kumar, support from Milind Soman
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान, ट्रोल झाल्यानंतर अक्षयने सोशल मीडियावर माफी मागत लिहिले होते की, “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.”
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525928629084871/
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं तर आता त्याच्याकडे बरेच चित्रपट आहेत. अलिकडेच त्यानं भोपाळमध्ये ‘सेल्फी’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या चित्रपटात इमरान हाश्मी, नुसरत भरूचा आणि डायना पेंटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय अक्षय कुमारकडे ‘पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट देखील आहेत.